
जो खुद के सुखो को त्याग कर दुसरो को सुख दे वो है भगवान महावीर साध्वी श्री पुण्यरत्नाश्रीजी मारासाब
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
दि.१०एप्रिल गुरूवार ला या वर्षीचा भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव मोठ्या उत्साहात वडकी इथे साजरा करण्यात आला असून हा कार्यक्रम दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी राळेगाव व मारेगाव या दोन तालुक्यातील जैन समाज बावीस वर्षांपासून एकत्रीत येऊन खैरी,वडकी,कुंभा,मार्डी,वनोजा (देवी)व मारेगाव इथे साजरी करत असतात हे या दोन तालुक्यातील जैन समाजाचे वैशिष्ट्य आहे.
या वर्षी चा वडकी येथिल श्री संघाचे अहोभाग्य की भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव भगवान महावीर यांचे अनुयायी साध्वी श्री पुण्यरत्नाश्रीजी माराब व त्यांच्या सुशिष्या साध्वी श्री सुरत्नाश्रीजी मारासाब यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली सर्व प्रथम झांबड यांचे घरापासून भगवान महावीर की जय,त्रिशला नंदन वीर की जय बोला महावीर की,या नाऱ्याच्या जल्लोषात व शहनाई च्या मधुर स्वरात व वर वाज्याच्या आवाजात रथयात्रा काढण्यात आली व ज्या ठिकाणी जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तिथ पर्यंत जैन बांधव रथयात्रे मध्ये शामील झाले वडकी येथिल सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी तेथील योग्य ठिकाणी भगवान महावीर स्वामी यांची रथयात्रा पोहोचताच भगवान महावीर स्वामी यांचा प्रतिमेला वंदन केले व रथयात्रेत शामील झालेल्या जैन बांधवांना महावीर जन्मकल्याणक च्या शुभेच्छा दिल्या व समता बंधुत्वतेचे प्रतिक म्हणून भगवान महावीर स्वामी यांचा प्रतिमेचे पुजन अहिंसा चे पालण करत मोत्यांच्या माळेनी , महात्मा जोतिबाजी फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर रथयात्रा आयोजित स्थळी पोहचले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सर्व प्रथम नवकार महामंत्र नी पंचपरमेष्ठी देवांना नमस्कार करणण्यात आला नंतर साध्वी श्री पुण्यरत्नाश्रीजी मारासाब यांचे प्रवचन प्रवचनात पुण्यरत्नाश्रीजी मारासाब उपदेश करतांना आज आपण भगवान महावीर स्वामी यांच जन्मकल्याणक दिवस साजर करत आहो भगवान स्वामींच्या जिवनावर प्रकाश टाकत असताना भगवान महावीर हे करूणाचे धारी होते. भगवान महावीर स्वामी हे स्वताच सुखाची चिंता न करता दुसऱ्या जिवांच्या सुखाची चिंता करून जगणारे होते कोणत्या ही जिवाची हिंसा होऊ नये म्हणून व कोणत्याही जिवाला त्रास होऊ नये म्हणून ते एकटेच राजपाठ च्या त्याग करून निघून गेले व एकट्यांनीच दिक्षा ग्रहण केली यावर त्यांनी उपदेश केला नंतर वडकी श्री संघ द्वारे मारेगाव श्री संघ,खैरी श्री संघ,मार्डी श्री संघ,वनोजा देवी श्री संघ कुंभा श्री संघ व मारेगाव येथिल डॉ.लोढा यांचे स्वागत करण्यात आले भगवान महावीर स्वामी यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा व्हावा म्हणून छोट्या छोट्या चिमुकल्यांन पासून तर मोठ्यांन पर्यंत कोणी नृत्य सादर केले कोणी भजन गायिले तर कोणी नाटीका पेश केली या जन्मोत्सव चा सर्व जैन बांधवांच्या मनात उत्साह दिसून येत होता या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संगिताजी मोहता यांनी तर प्रास्ताविक अश्विनी झांबड यांनी केले तर आभार प्रदर्शन बालुजी बाघमार यांनी केले असून मंगलपाठानी कार्यक्रम ची सांगता करण्यात आली व नंतर भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त महाप्रसादाचे चे आयोजन करण्यात आले होते सर्वांनी महाप्रसादीचा आस्वाद घेतला व पुढील वर्षाला मार्डी या गावी जन्मकल्याणक साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली.
