

वणी येथील शासकिय मैदानावर प्रथमच होत असलेली भव्य बक्षिसाची लूट दि,6ऑक्टोंबर ते 16ऑक्टोबर दरम्यान दिवस व रात्रकालीन t-10 क्रिकेट टेनीस बाॅल चॅम्पियनशिप लिग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन शहरातील प्रसिद्ध पारसमल प्रेमराज ज्वेलर्स चे कूणाल विजयबाबू चोरडिया यांच्या वतीने करण्यात आले आहे,या स्पर्धेत दररोज बक्षिसाची लयलूट करण्यात येणार असून मॅन ऑफ द सिरीज मिळविणार्या स्पर्धकाला राॅयल इनफिल्ड हंटर बूलेट या स्पर्धेचे आयोजक पारसमल प्रेमराज ज्वेलर्स वणी च्या वतीने दिल्या जाणार आहे.
या स्पर्धेचे उद्धघाटन दि,6 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष नितीणजी भूतडा हे प्रामूख्याने उपस्थित राहणार आहे,तर प्रमूख पाहूणे म्हणून आमदार संजिवरेड्डी बोदकूरवार,भाजपाचे प्रदेश सदस्य विजयबाबू चोरडिया,उपविभागिय अधिकारी डाँ,शरद जावळे,उपविभागिय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार हे उपस्थित राहणार आहे.आयोजित करण्यात आलेल्या t-10 क्रिकेटचे सामने टेनिस बाॅलने खेळले जाणार असून एका दिवशी 5 सामने खेळले जाणार आहे,अाणि प्रत्येक मॅच ही 10 ओवरची राहणार असून प्रथम विजेत्यांना 5 लाख रूपये व ट्राफी देऊन खेळाडूचा सन्मान करण्यात येणार आहे,दूसर्या क्रमांकाच्या विजेत्यांना 2 लाख 51 हजार रूपये व सन्मानचिंन्ह,तिसर्या क्रमांकाच्या विजेत्यांना 1 लाख रूपये व सन्मान चिन्ह,चौध्या क्रमांकाच्या विजेत्यांना 51 हजार रूपये व ट्राफी देण्यात येणार अाहे,मैदानावर भंव्य एलईडी स्र्किन लावण्यात येणार आहे,महिला प्रेक्षकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे,प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केली असून हि स्पर्धा पहाण्यासाठी सर्व वणीकर क्रिडाप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन कूणाल चोरडिया यांनी केले आहे.
T-10 चॅम्पीयन लीग कार्यकारिणी खालील प्रमाणे
उपाध्यक्ष-मनिष गायकवाड,सचिव-संदिप बेसरकर,सहसचिव-राजू इंगोले,क्रोषाध्यक्ष-पियूष चव्हाण,सहक्रोषाध्यक्ष-उमेश पोद्दार,कार्य प्रमूख-कार्तिक देवडे,सहकार्य प्रमूख-शूभम मदान,प्रसिद्धी प्रमूख-तौसिफ खान,सहप्रसिद्धी प्रमूख-मयूर घाटोळे,सल्लागार-संघदीप भगत,सल्लागार-प्रकाश तूराणकर,सल्लागार-तौसिफ चिनी
