
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
अमृत महोत्सवी निमित्त महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान संपूर्ण देशासह राज्यात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येत आहे. त्यानिमित्तने पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान हाती घेतले. या अभियानाचे प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून माजी पंचायत समितीचे सभापती अल्काताई आत्राम, पोंभूर्णा नगर पंचायतचे नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, गटनेते आशिषभाऊ कावटवार,नगरसेवक बालाजीभाऊ मेश्राम,नगरसेवक,अतुलभाऊ वाकडे, नगरसेविका शेवताताई वनकर, आकाशीताई गेडाम, रोहनीताई ढोले, उषाताई गोरंतवार, शारदाताई गुरूनुले, गुरूभाऊ पिपरे व ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.कोमलताई गरड,यांची प्रमुख उपस्थती होती या प्रसंगी परिसर स्वच्छता करून नंतर सर्वांनी एकत्र परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी शपथ घेतली. यावेळी डॉ.किशोर वाडपल्लीवार, डॉ. तामगाडगे, डॉ.प्रणव जीवने, डॉ. मुरनी माहूरकर,आदी कर्मचारी उपस्थित होते.
