जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्या वाटप

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सोमवार 10 ऑक्टोंबर 2022 रोजी बालकांना जंतनाशक गोळ्या वाटप करण्याची मोहीम शाळेत राबविण्यात आली. या मोहिमेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री मा.जयंत कातरकर , उपाध्यक्ष मा. श्री अनिल खंडाळकर वआरोग्यवर्धिनी उपकेंद्र येरला येथील डॉ. राऊत मॅडम व वानखेडे सिस्टर तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते डॉ.राऊत मॅडम यांनी मुलांना जंतनाशक गोळ्याचे महत्त्व सांगितले. त्यांनी सांगितले की शैक्षणिक विकासाकरिता मुलांचा शारीरिक विकास होणे महत्त्वाचे आहे त्यामुळे मैदानात खेळत असताना स्वच्छता न पाळल्यास आजारांना निमंत्रण मिळते त्यामुळे कृम्मी दोष लहान वयात सहज होणारा आजार आहे आणि त्यामुळे शारीरिक व वैयक्तिक विकासावर परिणाम होतो व शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते त्यामुळे सर्व मुलांनी जंतनाशक गोळी घेणे आवश्यक आहे व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.