
प्रतिनिधी :परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर
संपुर्ण महाराष्ट्रात छत्रपीत शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन हा “शिवस्वराज्य दिन” म्हणून ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारकडून निर्देश आणि मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. संपुर्ण महाराष्ट्रातील पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कार्यलयांना सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संकट अजूनही डोक्यावर असल्यामुळे राज्यात शिवस्वराज्य दिन कशाप्रकारे साजरा करायचा आहे. याची नियमावली सादर करण्यात आली आहे. ग्राविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ६ जून हा दिवस शिवस्वराज्यदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले आहे.भगवा स्वराज्यध्वज संहिता – ध्वज हा उच्च प्रतीचे सॅटीन असलेली भगवी जरी पताका असावी. ध्वज हा २ फुट रुंद आणि ६ फूट लांब या प्रमाणात असावा म्हणजेच लांबी ही रुंदी पेक्षा दुप्पट असावी. ध्वज हा जिरेटोप, सुवर्णहोन,जगदंब तलवार,शिवमुद्रा,वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी छापील स्वरूपात उपलब्ध करावे असे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले आहे.
