गट विकास अधिकारी यांच्या विरोधात जि. प. अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे लेखी तक्रार

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

घाटंजी पंचायत समीती अंतर्गत 15 व्या वित्त आयोगाची सुट्टीच्या दिवशी ई निविदा काढल्याने घाटंजी पंचायत समितीच्या अध्यक्ष व सचिवाने सदरची नियमबाह्य ई निविदा तात्काळ रद्द करुन शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार नविन ई निविदा काढण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, सरीता मोहन जाधव, पावणी रुपेश कल्यमवार पंचायत समिती सदस्य अभिषेक शंकरराव ठाकरे नयना जिवन मुद्देलवार आदींनी विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ आदींकडे समक्ष लेखी तक्रार करुन घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांना तात्काळ निलंबित करुन त्यांचे स्थानांतर करुन नियमानुसार त्यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याची मागणी, जिल्हा परिषद सदस्य आशीष लोणकर, सरीता जाधव, पावतीताई कल्यमवार, पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे व नयना मुद्देलवार आदींनी समक्ष भेटुन लेखी तक्रारीतुन केली आहे. तक्रारीच्या प्रती विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी यवतमाळ या सह ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आंदी कडे ई-मेल ने पाठवण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य अभिषेक ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान, घाटंजी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी यांच्या विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कालींदा पवार व मुख्य कार्यकारी अधिकारी डाँ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे कारवाई करण्याचे आश्वासन दिले