
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आपल्या लेखणीतून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून तळागाळातल्यांचा आवाज शासन दरबारी पोहोचून सदैव न्याय देण्याची भूमिका जोपासत असलेले व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट लिखाण, उत्तम भाषा,शब्द संग्रह,बातमी मांडण्याची पद्धत या त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रपाल मुद्रका वामन भोंगाडे यांना लेखणीरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
राष्ट्रशक्ती फिल्म मुंबई द्वारा आयोजित संत गाडगेबाबा पुरस्कार सोहळा २०२५ च्या वतीने सामाजिक, राजकीय, सहकार ,शिक्षण, उद्योग, कृषी, साहित्य, कला, क्रीडा ,आरोग्य ,पत्रकार ,युवा, महिला बचत गट, महिला मंडळ ,आदर्श ग्रामपंचायत ,डान्स, सोलो डान्स, ग्रुप डान्स, एक पात्री नाट्य प्रयोग, संगीत/ गायन, फॅशन शो पारंपारिक वेशभूषा आदी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्यांना कलारत्न पुरस्कार, समाज रत्न पुरस्कार, व लेखनी रत्न ,पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा सेलिब्रेशन हॉल मेडिकल कॉलेज चौक यवतमाळ येथे दिं ११ मे २०२५ रोज रविवारला पार पडला असून या पुरस्कार सोहळ्या प्रसंगीआमदार बाळासाहेब मांगुळकर विधानसभा यवतमाळ, संतोष अरसोड सत्यशोधक गाडगेबाबा या पुस्तकाचे लेखक,डॉ. अंजली गवार्ले,संचालिका गवार्ले पाइल्स हॉस्पिटल तथा मेडीस्क्रीन भारत इंटरनॅशनल सोशल आयकन यवतमाळ, मा. बाबाराव मडावी आकांतकार यवतमाळ, राष्ट्रफिल्म चे अध्यक्ष रवी भोंगाडे,अतुल कुडवे सीने दिग्दर्शक मुंबई ,अक्षय राजेश अहिव सह्याद्री दूरदर्शन वर्धा जिल्हा प्रतिनिधी, संदीप उरकुडे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया संपादक संघ मुंबई, श्रीकांत भाके अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई शाखा कारंजा, हफिज खान संगीत दिग्दर्शक कोरिओ ग्राफर व पत्रकार संघ कारंजा, आदी मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रपाल मुद्रका वामन भोंगाडे यांना लेखनीरत्न पुरस्कार व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे तसेच जानेवारी महिन्यात ही वणी येथे राष्ट्रपाल भोंगाडे यांना माणिक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांना मिळालेल्या लेखणी रत्न पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून राष्ट्रपाल भोंगाडे यांचे कौतुक होत आहे.
