
सहसंपादक : रामभाऊ भोयर
वर्धा पथकातील केळझर येथील रहिवासी गजानन चांदेकर यांचे वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्याने महाराष्ट्र होमगार्ड संघटनेतून सेवा समाप्ती झाली असल्याने सेलु पोलीस स्टेशन मधील होमगार्ड सैनिक यांचे कडून वर्गणी गोळा करून शाल श्रीफळ व दिवाल घड्याळ भेट देवून सत्कार करून गजानन चांदेकर यांना होमगार्ड संघटनेतून निरोप देण्यात आला
गजानन चांदेकर यांनी 9/1/1990 साली होमगार्ड संघटनेत नियुक्ती केली होती तसेच 9/11/2024 रोजी त्यांची सेवा समाप्ती झाली वयाचे 34 वर्ष होमगार्ड संघटनेला सेवा दिली
परंतु निष्काम सेवा हे संघटनेचे ब्रीद वाक्य असल्याने त्यांना संघटनेतून खाली हाताने घरी परत जावे लागल्याने त्यावेळी त्यांना अश्रू अनावर झाल्याचे चित्र दिसून आले.
इतर राज्य कर्मचारी यांची नोकरीतून सेवा समाप्ती झाल्या नंतर भरघोस रक्कम व पेन्शन मिळवून आनंदात गाजा वाजाने मिरवणूक काढून आनंदात घरी जातात परंतु होमगार्ड सैनिक वयाचे 58 वर्ष पूर्ण झाल्यावर होमगार्ड संघटनेतून खाली हाताने परतत असल्याने परिवाराकडूनही हिंनतेने बघितले जात असल्याची भावना या वेळी गजानन चांदेकर यांचेसह अनेक जवानांनी बोलून दाखविल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे होमगार्ड सैनिक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उत्कृष्टरित्या बंदोबस्त पार पाडतात कोरोणा काळात सुधा भारतासह विदेशात मृत्यूचे तांडव सुरू असताना रोडवर उभे राहून जनतेची सेवा केली
इद गणपती नवरात्री पोळा मोहरम इलेक्शन बंदोबस्त या सारखे अनेक बंदोबस्त चोख पणे पार पाडत असलेल्या होमगार्ड जवानांची म्हातारपणी शासनाने कुठलीच उपाययोजना केली नाही.
आता पर्यंत विविध संघटनांकडून व होमगार्ड सैनिकांकडून महाराष्ट्र शासनास पाचशेच्या वर निवेदने दिली परंतु अद्याप पर्यंत शासनाकडून होमगार्ड सैनिकांसाठी ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याने होमगार्ड सैनिकांकडून तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
अंगणवाडी सेविका आशा वरकर पोलीस पाटील यांना चांगल्या प्रकारे मासिक मानधन शासनाने बहाल केले मात्र पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून दिवस रात्र काम करणाऱ्या होमगार्ड यांना वर्षाकाठी किमान 60 दिवस काम दिले जात आहे त्यातच आता 1283 रुपये मानधन वाढवून होमगार्ड सैनिकांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप होमगार्ड सैनिक करत आहे त्यातच महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी सुधा होमगार्ड विषयी कुठलाच मुदा उचलून धरत नसल्याची ओरड होऊ लागली असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे
आता पर्यंत शासनास 500 शेच्या वर निवेदन देण्यात आले असून त्यात होमगार्ड यांना 365 काम द्यावे इतर राज्यांप्रमाणे नियमित करून मासिक वेतन द्यावे म्हातारपणात सुरक्षित जगण्या करीता पिफ ग्रॅज्युटी पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली परंतु महाराष्ट्र शासन केवन खोटे आश्वासन देवून होमगार्ड सैनिकांची दिशाभूल करीत असल्याचं होमगार्ड सैनिकांकडून बोलले जात आहे.
वयाचे 58 वर्ष पूर्ण झाले असून आतापर्यंत 34 वर्ष मी नियमितपणे सेवा दिली परंतु आज सेवा समाप्ती झाल्यानंतर मी खाली हाताने घरी परतलो असता मुलांनी बाबा तुम्हाला पेन्शन मिळणार का इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हालाही मोठी रक्कम मिळणार का असा प्रश्न विचारला असता डोळ्यातून अश्रू अनावर झाले म्हातारपणात आता कसे जगावे मुलांचे भविष्य कसे सुधारावे असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे त्यामुळे शासनाने त्वरित इतर होमगार्ड सदस्यांचे भवितव्य अंधारात जाऊ नये याकरिता तत्काळ ठोस उपाययोजना करावी व म्हातारपणात त्यांना सन्मानाने जगता यावे याकरिता लक्ष घालावे अशी शासनास नम्र विनंती
होमगार्ड सैनिक
सेवानिवृत्त गजानन चांदेकर
