
सहसंपादक : रामभाऊ भोयर
शेतकऱ्यांविषयी अपमानास्पद आणि बेजबाबदार विधान करणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तात्काळ कारवाई करून राजीनामा घ्यावा, अशी तीव्र मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे आज करण्यात आली.या पार्श्वभूमीवर पक्षाने राळेगाव येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत शासनाला निवेदन सादर केले. या निवेदनाद्वारे कृषिमंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत, शेतकऱ्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.
या निवेदनप्रसंगी पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप कन्नाके, महिला तालुकाध्यक्ष वंदनाताई काकडे, शहराध्यक्ष प्रकाश खुडसंगे, तालुका सरचिटणीस गौतम तागडे, उपाध्यक्ष प्रवीण काकडे, सूर्यभान लांजेवार, संजय भोरे, दिगंबर वडुळकर, सुभाष कोहळे, नारायणराव धानोरकर, पुरुषोत्तम बेंबारे, नागोराव कुमरे, गजानन धोटे, किशोर चांदेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.पक्षाने स्पष्ट केले की, शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक भाष्य करणाऱ्या मंत्र्यांना कृषी खात्यासारख्या संवेदनशील पदावर राहण्याचा अधिकार नाही. या पार्श्वभूमीवर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
