
यवतमाळ
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
उमरखेड रस्त्यावरील पेट्रोल पंपाच्या समोर विदर्भ वाईन बारच्या विरुद्ध दिशेला राज्य महामार्ग वरील मनोज सुरोशे यांच्या शेतात रोडच्या बाजूला घुबड हा पक्षी अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे जखमी अवस्थेत युवा शेतकरी रवींद्र कोपरकर व नितीन नरवाडे यांच्या दृष्टीस पडला सदर घुबड पक्षाला शेतकऱ्यांनी प्रथमोपचार करून करून महागाव वनपरिक्षेत्र वनरक्षक दत्तराव धुमाळे व दत्तराव माहुरे कर्मचारी यांच्याकडे सुपूर्त केला. घुबड हा पक्षी आकाराने मोठा होता अंदाजे पाच किलो वजनाचाअसावा त्याला दिवसा दिसत नसेल या कारणास्तव वाहनाला धडक लागून तो बराच जखमी झाला होता. वेळेचे प्रसंगावधान राखून रवींद्र कोपरकर व नितीन नरवाडे या शेतकऱ्याने त्याला जीवदान दिले .वनपरिक्षेत्र कार्यालय वनरक्षक वनरक्षक यांच्या स्वाधीन करून घुबड या पक्षाला संरक्षण दिले आहे. या घटना मुळे महागाव शहरातील पक्षी मित्र व सामाजिक संघटना समाज कडून त्यांचे समाज माध्यमांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
