
सहसंपादक : रामभाऊ भोयर
फेब्रुवारी /मार्च2025 ला घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल दिनांक 05 मे रोजी जाहीर झाला असून स्व. खुशालराव मानकर कनिष्ठ महाविद्यालय सावरखेडा या महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची परंपरा अबाधित राखत विज्ञान शाखेचा 98.71 % निकाल लागून , निकालाची परंपरा कायम ठेवली.
उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी एकूण 78 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते . त्यापैकी 77 विद्यार्थी पास आऊट झाले त्यात ग्रेड वन मध्ये 13 विद्यार्थी, ग्रेट टू मध्ये 52 विद्यार्थी, आणि ग्रेट थर्ड मध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
विज्ञान शाखेत कु पूर्वा पुरुषोत्तम होले 64.33% मिळवून महाविद्यालयातुन प्रथम आली आहे.कु संबोधी राहुल दखणे 63.67% मिळवून द्वितीय आली, कु.अवंती प्रवीण झोटिंग 63.50% मिळवून तृतीय आली व कु तनवि वीजय रुजूतकार 63.33% मिळवून चतुर्थ आली आहे.
सर्व प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री. स्वामी समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था कृष्णापुर संस्थापिका अध्यक्षा मा.सौ उज्वलाताई फुटाणे, संस्थेचे सचिव मा.अरविदभाऊ फुटाणे प्रा.एम डि कावडे,प्रा श्रीकांत लाकडे,प्रा.ए.एन काझी,प्रा.कु.के. डब्ल्यू परचाके,प्रा.कु.के.के ठाकरे, प्रा.सौ एम.एस.गावडे,प्रा कु एस एम महाजन, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी एस एन कांबळे,आर एस फुटाणे,यु पि तेलंगे यां सर्वांनी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, आप्तस्वकीयांना दिले.
