
प्रतिनिधी:कल्पक ढोरे,वरोरा
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब बाळासाहब ठाकरे नेतृत्वात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनभाऊ मत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली, शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांनी पंचायत समिती शेगाव क्षेत्र शेगाव येथे शिवसेना संपर्क अभियान राबवून सभा घेण्यात आली. त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख वरोरा मुकेशभाऊ जिवतोडे यांनी शिवसैनिकांना पक्ष वाढविण्याबाबत मार्गदर्शन करून शिवसेना पक्षाची जबाबदारी शिवसैनिकांना सांगितली.त्यावेळी उपस्थित शिवसेना उपतालुका प्रमुख राजूभाऊ राऊत, विभाग प्रमुख गजाननभाऊ ठाकरे, शिवसेना नगरसेवक दिनेशभाऊ यादव, युवासेना तालुका प्रमुख वरोरा भूषण बुरेले, उपशाखाप्रमुख अभिषेक रायपूररकर, युवासेना शहरप्रमुख अनिकेत हिवरे, प्रणय कामडी, शिवसेना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक, युवासैनिक, महिला संघटक, पदाधिकारी होते. एक हाती सत्ता येण्यासाठी भगव्या झेंडा फडकविण्यासाठी व शिव संपर्क मोहीमसाठी पंचायत समिती शेगाव क्षेत्रातील शिवसैनिक नेहमीच कार्यशील असतात अशे शिवसेना उपतालुका प्रमुख वरोरा राजूभाऊ राऊत यांनी म्हटले. शिवसैनिकांनी जय भवानी जय शिवाजी नारे लावत शिवसेनेशी एकनिष्ठ राहता पक्षाची जबाबदारीं पार पाडणार असे शेगाव येथील शिवसैनिकांनी म्हटले. या सभेचे आभार प्रदर्शन विभागप्रमुख शेगाव गजाननभाऊ ठाकरे यांनी केले.
