
प्रतीनिधी: प्रवीण जोशी(ढाणकी )
नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
विविध कार्यकारी सोसायटी समोर अरुंद अवस्थेत असलेल्या नादुरुस्त पुलामुळे डॉक्टर कवडे साहेब यांच्या हॉस्पिटलमध्ये आपली चार चाकी घेऊन उपचारासाठी आलेल्या एका परिवाराचा नागरिकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात होता होता वाचला उपचारासाठी आलेल्या चार चाकी च्या चालकाला नादुरुस्त असलेल्या पुलाचा अंदाज न आल्यामुळे गाडीचे एक चाक नालीच्या खड्ड्यामध्ये गेले ही बाब तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना लक्षात आल्यावर पडत्या पाण्यात त्या ठिकाणी ताबडतोब धावत जात एका बाजूने गाडी उचलून पकडत गाडी खड्ड्यातून काढण्यात मदत केली, नागरिकांच्या सतरतेमुळे अख्खी गाडी खड्ड्यात जाता जाता राहिली आणि मोठा अपघात होता होता टळला यावेळी संभाजी गोरटकर युवा सेना तालुकाप्रमुख, सय्यद माजीद सय्यद पाशा प्रहार तालुकाप्रमुख, जॉन्टी विणकरे , वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव, यांनी सदर गाडी खड्ड्यातून बाहेर काढण्यास मदत केली.मानवतेचे उत्तम उदाहरण व एकीच्या बळाचे महत्त्व काय असते हे कळले.
