बजरंग दल राळेगाव प्रखंड तर्फे सामुहिक हनुमान चालीसा पठण

सहसंपादक -रामभाऊ भोयर

बजरंग दल राळेगाव प्रखंड तर्फे हनुमान देवस्थान गांधी ले आऊट येथे सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले, यात राळेगाव येथील अनेक युवकांनी तथा नागरिकांनी सहभाग घेतला, बजरंग दल तर्फे प्रतिक गिरी, जगदीश निकोडे, सागर वर्मा, हर्ष येडे, सागर वनस्कर, पवन वर्मा व अनेक युवा सहभागी झाले होते, मामा चांदे यांनी विशेष सहभाग घेतला, हनुमान चालीसा पठण झाल्यानंतर प्रतिष्ठित व्यापारी सुरेश गहरवाल यांच्या हस्ते विर शिरोमणी महाराणा प्रताप जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करून पूजन करण्यात आले, अनेक नागरिक उपस्थित होते, काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे निवडणुकीत जाहीरनाम्यात बजरंग दल या संघटनेवर बंदी घालण्याचे घोषित केल्याचे निर्णयाविरुद्ध सामूहिक हनुमान चालीसा पठण करून निषेध नोंदवल्याची माहिती प्रखंड मंत्री ॲड प्रीतेश वर्मा यांनी दिली.