
सोनामाता हायस्कूल येथे दि २२जुलै पासून सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहाचा समारोप दि.२८जुलै रोज रविवारला समुदाय सहभाग दिवस तथा तिथी भोजन या उपक्रमाने समारोप करण्यात आला.
भारत सरकारच्या शिक्षण विभागाच्या पत्रानुसार महाराष्ट्र सरकारने सर्व राज्यभर शिक्षण क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चा चौथा वर्धापन दिन शिक्षण सप्ताह आयोजित करून शाळेत साजरा करण्यात आला. या सप्ताहात प्रथम दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य निर्मिती व त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. दुसऱ्या दिवशी मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान दिन साजरा करण्यात आला. तिसरा दिवस हा क्रीडा दिन असल्यामुळे या दिवशी विविध मैदानी व वर्गातील वैयक्तिक व सामूहिक खेळ घेण्यात आले. चौथा दिवस हा सांस्कृतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला या दिवशी विद्यार्थ्यांनी विविध कला च्या माध्यमातून नृत्याविष्कार सादर केले. पाचव्या दिवशी कौशल्य दिन व डिजिटल साक्षरता दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कौशल्यमध्ये आपले प्रावीण्य दाखवले. सहावा दिवस वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला . शिक्षण सप्ताहाचा समारोपप्रसंगी पंचायत समिती राळेगाव चे गटशिक्षणाधिकारी, मा. राजू काकडे, जिल्हा परिषद हायस्कूलचे मा. बोबडे सर ,तसेच गावातील माजी विद्यार्थी राहुल पाटील व सचिन गवारकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी माननीय गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक माननीय धोबे सर , चिव्हाने सर,कांबळे सर, शिवणकर सर, दांडेकर सर, गोवर्दिपे मॅडम, गावंडे मॅडम, सावंत सर, देवानंद सोनवणे, प्रथमेश राऊत तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे आभार दांडेकर सर यांनी मानले. अशाप्रकारे शिक्षण सप्ताहाचा चाहात समारोप करण्यात आला.
