
सहसंपादक : रामभाऊ भोयर
खैरी (वार्ड क्र. १, मानीपूर) येथील नागमंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरीची घटना घडवून आणली. मंदिरातील चांदीच्या तसेच अन्य धातूपासून बनवलेल्या अनेक नागमूर्ती चोरट्यांनी पळवून नेल्या. सकाळी भाविक देवधुलाईसाठी मंदिरात गेले असता नागमूर्ती गायब असल्याचे लक्षात आले. यानंतर तातडीने ही माहिती वडकी पोलिस ठाण्याचे ठाणेदार सुखदेव भोरखडे यांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार भोरखडे व खैरी बिट जमादार अमोल चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या पुढील तपास वडकी पोलिस करीत आहेत.
