
सहसंपादक :: रामभाऊ भोयर
केळापूर तालूक्यातील समस्त कला प्रवर्गातील कलावंत ,वारकरी, भक्ती संप्रदायातील कलावंत,गावखेड्यातून भजन गायन करणारे संघटीत नोंदणीकृत व अनोंदणीकृत कलावंत ,प्रबोधनकार
किर्तनकार,पथनाट्य ,ई.चे न्याय्य हक्काचे प्रश्न सोडविणे, ,जेष्ठ कलावंतांचे मानधनात भरीव वाढ करण्यास प्रयत्न करणे,जिल्ह्याचे ईष्टांक वाढवून दूप्पट करण्याची मागणी रेटणे,महीला कलावंतांना 50% आरक्षण ,मोफत एस टी बस प्रवास सवलत,कलावंताना शासकीय सन्मान व पूरस्कार देणे,ई. कलावंतांच्या हिताच्या शासनाच्या योजनाचा लाभ त्यांना मिळवून देण्या बाबत मार्गदर्शन तथा प्रयत्न करणे,कलावंतांना आर्थिक सक्षम करण्यासाठी अग्रेसर असणारी अ.भा.कलावंत न्याय हक्क समिती ला जिल्ह्याच्या तळागातील अतिदूर्गम गाव खेड्यातून कलावंतांचा व्यापक प्रतिसाद मिळत आहे,कलावंत एकीच्या ताकदीची जाणीव शासनाला करून देण्यात कलावंत समिती यशस्वी झाल्याने शासन कलावंतांच्या प्रश्नाची दखल घेत आहे.
केळापूर तालूक्यातील सर्व कलावंतांना मार्गदर्शन व कार्य करण्यासाठी दि.14 जूलै 2025 रोजी हभप.तथा प्रबोधनकार विलासराव गोडे ह्यांची तालूकाध्यक्ष पदावर समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांचे मार्गदर्शनात व विदर्भ प्रदेश कार्याध्यक्ष सिध्दार्थ भवरे ह्यांचे अध्यक्षतेखाली नियूक्ती आदेश देण्यात आला.ह्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष अविनाशजी बनसोड, ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,संघटक अशोकराव ऊम्रतकर,महासचीव प्रबोधनकार रमेश वाघमारे ,राळेगाव तालूकाध्यक्ष ,तथा गूरूदेव सेवा मंडळाचे जिवन प्रचारक आदरणीय गंगाधररावजी घोटेकर दादा,दिग्रस तालूकाध्यक्ष वसंतरावजी पवार,ई.मान्यवर ऊपस्थित होते.त्यांच्या नियूक्तीचे जिल्ह्यातील समस्त कलावंत
अभिनंदन व स्वागत करीत आहे.
