
15ऑगस्ट ला जल समाधी घेणार प्रकल्प ग्रस्त संजय अतकरी , कुही तालुक्यातील अनेक गावे गोसेखुर्दे धरणात पुनर्वसन झाले असून अनेक वेक्ति लाभा पासून वंचित राहावे लागत आहे, याचा हा प्रकार अधिकारी व कर्मचारी यांच्या उदासीनतेमुळे आज पर्यंत अनेक लोकांनी आत्महत्या केलेली आहे व प्रशासन निद्राअवस्थेत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मागील 2010 पासून प्रकल्प ग्रस्तांना भूखंड वाटप सुरू आहे पण जे खरे भूखंड धारक आहे त्यांना वगळून नियमबाह्य भूखंड वाटप करण्यात आले आहे याचे जिवंत उदाहरण आपल्याला कुही तालुक्यातील कुही तहसीलदार यांच्या तहसील कार्यालयात दिसत आहे, ज्यांचे घर गेले, शेती गेली , आपला जीवन दुसऱ्या करीत अर्पण केले मोठ्या मनाने शेती गोसेखुर्द धरणात दान दिले पण याची जाणीव शासनाला व अधिकारी यांना नाही. कारण त्यांना भ्रष्टाचार कशाप्रकारे करता येईल याचे कडे जास्त प्रमाणात लक्ष दिले जातात याचा एक उदाहरण म्हणून प्रकल्प ग्रस्त भगवान मारोती अतकरी, चीचघाट तसेच प्रकल्पग्रस्त दुर्वेधन इस्तरी खंगार नवेगाव, यांची संपूर्ण जमीन घर गोसेखुर्दे मध्ये संपादित झाली असून त्यांना आजपावेतो भूखंडापासून वंचित राहावे लागत आहे. 2014 ते2022 पर्यंत शेकडो निवेदन अर्ज देऊन सुद्धा ते आपल्या हक्का पासून वंचित ठेवण्याचे काम उपजिल्हाधिकारी, नागपूर , उपविभागीय अधिकारी उमरेड , तहसीलदार, कुही, व श्रीमती जाधव मॅडम यांच्या भोंगळ कारभारामूळे त्यांना जीवन संपविण्याची वेळ आली आहे .त्या कडे वारंवार अर्ज सादर करून सुद्धा भूखंड देत नाही.
खरा प्रकल्पग्रस्त नाही पुनर्वसन मध्ये शेती गेली नाही घर गेले नाही त्यांना यांनी चिरीमिरी करून भूखंड वाटप केलेले आहे व आम्ही भूखंड मागणी करीता गेलो तर आम्हाला म्हणतात की आज पर्यंत तुम्हाला भूखंड का नाही मिळाले हे उलट चोरांच्या उलट्या बोंब करीत आहे.आज पर्यंत भूखंड का नाही देण्यात आले हे तपासाचे काम कुणाचे तुमचे की आमचे तुम्ही जनतेचे नोकर आहात जनता मालक आहे. आमच्या पैसा तुमचा परिवार चालते व तुम्ही उलट आम्हाला विचारता की आज पर्यंत का भूखंड मिळाले नाही हा तपासणी करायचा अधिकार तुम्हाला असून उलट ज्यांना भूखंड वाटप नाही करायचे त्यांना करण्यात आपणच म्हणतात की एका व्यक्तीला एकच भूखंड वाटप करण्यात येतो मग एका व्यक्तीला चार ते पाच भूखंड कशा प्रकारे कोणत्या नियमाने वाटप करण्यात आले.एका च कुटुंबातील सदस्य यांना चार चार पाच पाच भूखंड वाटप करण्यात आले म्हणजे चिरीमिरी स्वरूपात काम केले तर कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे न पाहता भूखंड वाटप करायचे आणि ज्यांनी आपला घर शेती शासनाला दिली त्यांनी जीवन यातना सहन करावा हा कोणता न्याय आहे म्हणून एका ला आई चा व एका ला मावशी चा प्रकार पुनवर्सन अधिकारी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी तहसीलदार, व पुनवर्सन लिपिक यांचा मोठ्या प्रमाणावर चालू आहे तरी या करिता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरन या संपूर्ण अधिकारी यांची सखोल चौकशी करून यांनी भूखंड वाटपात झालेल्या भ्रष्टाचार उघड करून मला न्याय देण्यात यावा अन्यथा 15
ऑगस्ट जनता स्वतंत्र दिवस साजरा करत व आम्ही आपल्या परिवार सोबत जल समाधी घेतली जाईल यांचा करिता आपला प्रशासन व या गोशेखुर्द पुनर्वसन संबंधित संपूर्ण अधिकारी व कर्मचारी राहतील चेतावणी एका प्रकल्प ग्रस्त संजय भगवान अतकरी यांनी पत्रकार संघाला निवेदन देऊन आपली वेथा मांडली आहे तरी या कडे प्रशासनाने लक्ष वेधून आत्महत्या करण्या करीता भाग पडणाऱ्या अधिकारी यांची सखोल चौकशी करण्यात यावी व या प्रकल्प ग्रस्ताला न्याय देण्यात यावा यासाठी प्रकल्पग्रस्त लढा देत आहेत.
