जनतेच्या रक्षकांचा वाली कोण? पोलीस वसाहत समस्यांच्या विळख्यात

सर्वसामान्याच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलिस त्यांच्या कुटुंबासमवेत असुरक्षित वसाहतीत राहतात.

बिटरगांव बु. येथील पोलिस वसाहतीच्या इमारतीची अत्यंत बिकट दुरावस्था झाली असून या भागातील संपूर्ण वसाहती जिर्ण अवस्थेत आहेत. त्या ठिकाणी राहणे अत्यंत धोक्याचे झाले आहे. त्यामुळे तातडीने नवीन इमारत बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. बिटरगांव बु पोलीस स्टेशन हे बंदीभागातील इंग्रज कालीन असुन ३५ गावातील सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी जबाबदारी फक्त २५ कर्मचारी कायदा व सुव्यवस्था, शांतता राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी संपूर्णपणे बंदिभागातील नागरीकांच्या रक्षणासाठी कार्यरत आहे. सुरक्षा, अपघात, आंदोलने, बंदोबस्त यामुळे येथील पोलीसांवर कायम कामाचा ताण असतो. सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. आणि बंदिभागात असलेल्या बिटरगांव बु. पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची कुटुंबच उघड्यावर असल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहण्यास मिळते.

जुन्या वसाहतीत १४ घरांपैकी ३ ते ४ घरांमध्ये पोलीस कुटुंब वास्तव्य करत असून जीव मुठीत धरून राहण्याची वेळ आली आहे. याठिकाणी वसाहितीवर छतावर टिन पत्रे कमी आणि प्लास्टिकच्या मोठ्या ताडपत्री पावसाळ्यात या घरातील राहणाऱ्या कुटुंबाचे रक्षण करते. उन्हाळ्यात तुराट्यचा वापर करून छतावर उष्णतेपासून संरक्षण करते. प्रत्येक घरातील भिंतीना मोठ्या भेगा पडल्या आहेत. या घरांची रचना दहा बाय दहा ची असुन फक्त दोन खोल्यांमध्ये सहा ते आठ संख्या असलेले कुटुंब राहते. या अवस्थेत असलेल्या पोलीस वसाहतीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तुटलेल्या खिडक्या, कंपाऊंड वॉल, छतावर वाढलेले गवत, ताडकलेली टीनपत्रे, मोकळ्या जागेत वाढलेली काटेरी झुडपे, मोकाट जनावरांचा मुक्त संचार, ठिकठिकाणी फुटलेली पाइपलाइन, अशी अवस्था, दारे खिडक्या मोडक्या अवस्थेत असल्यामुळे बाहेर गावी जायचे असल्यास दाराला कुलूप लावण्याची गरजच नाही. कुत्रे, साप, विंचू हे पावसाळ्यात रोजचेच त्यांचे पाहुणे असल्या सारखे झाले असून काळ आला होता पण वेळ आली नाही. असे स्वतःला समज घालून दिवस वर्ष काढण्याची वेळ या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यावर आली आहे. या भागातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानाची अवस्था अतिशय दैनीय आहे. पोलिसांच्या नशीबी कोणतेही सण उत्सावांमध्ये आपल्या कुटुंबाला, नातेवाईक सोबत आनंद साजरा करता येत नाही.

पण त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून बिटरगांव ( बु )पोलीस स्टेशनची स्थापना इंग्रज कालीन असुन तेव्हा पासून कोणत्याही प्रकारची दुरूस्ती व डागडुजी करण्यात आलेली नाही. ज्या कर्मचाऱ्यांना गरज आहे त्यांनी वसाहितीची दुरूस्ती करून घ्यावी अशी परिस्थिती आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस काम करणाऱ्या पोलिसांचे कुटुंब मात्र जीव मुठीत धरून जगत असल्याचेचित्र दिसत आहे . तरी संबंधित विभागाने लक्ष देऊन नवीन वसाहिती देण्यासाठी येथील नागरिकांची मागणी होत आहे.