
चंद्रपूर:स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड खातेदाराला वाढीव बिल आल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ग्राहक क्रमांकावर फोन केला.त्यांनतर ग्राहकाच्या मोबाईल वर एक एस एम एस आला.त्यानंतर फोन करून सांगण्यात आले की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा मधून बोलत आहे आपले क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले आहे.नवीन कार्ड साठी लिंक पाठविण्यात आली आहे.

ग्राहकाने त्या लिंकवर क्लिक केले , ओ टी पी सांगितला व ग्राहकांच्या खात्यातून 2 वेळा पैसे काढीत गुजरातच्या भाईने चुना लावला.सायबर सेल चंद्रपूर च्या मदतीने उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलिसांचे एक पथक गुजरातला रवाना करण्यात आले.गुजरातच्या महाठग ला अटक करण्यात आली.

वरोरा शहरातील व्होल्टाज सागर कॉलनी येथील नितीन नक्षीने यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये खाते असून त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड ची सुविधेचा वापर करीत होते. महिन्याला 31 हजार रुपयांचे बिल जास्तीचे आल्याने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधला.वाढीव बिलाबाबत विचारणा केली असता त्यांना एक एस एम एस आला.त्यांनतर फोन करून तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक झाले असून तुम्हाला नवीन क्रेडिट कार्ड मिळणार असल्याचे सांगत नितीन नक्षीने यांच्या मोबाईल वर लिंक पाठवून माहिती भरून पाठविण्यास सांगितले.दिलेल्या लिंक मध्ये फिर्यादीला एक नंबर पाठवून 4 वेळा टाकण्यास सांगितलं त्यानुसार फिर्यादीने चार वेळा नंबर टाकत मोबाइलला आलेला ओ टी पी मागितला असे करत दोन वेळा 99 हजार तर दुसऱ्या वेळी 28500 रुपयांचा व्यवहार करीत हे पैसे स्वतःच्या खात्यात वळविण्यात आले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वरोरा पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सायबर सेल व पोलिसांच्या मदतीने आरोपीची माहीत काढण्यात आली .सादर आरोपी चे नाव जतीनभाई प्रद्युमान राज्यगुरू ,महुवा,जिल्हा:भावनगर गुजरात असे आहे.आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथक गुजरात येथे पाठविण्यात आले होते.आरोपीला ताब्यात घेत न्यायलयात हजर करण्यात आले. या आरोपी विरोधात मध्यप्रदेश येथे देखील अश्याच प्रकारचे फसवणुकीचे गुन्ह्यांची नोंद आहे.आरोपीला पोलीस कोठडी सुनावली असून दोन दिवसांचा पीसीआर देण्यात आला आहे.
