
सहसंपादक : रामभाऊ भोयर
जिल्हा परिषदेच्या वर्ष 2023-2024 चे जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी राबविण्यात आलेल्या प्रक्रियेतून प्राथमिक गटातून पंचायत समिती राळेगाव मधून जि.प.उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथील कार्यरत शिक्षक संदीप टुले यांची जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
नुकत्याच वसंतराव नाईक सभागृह जिल्हा परिषद यवतमाळ येथे पार पडलेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात त्यांना मा. ना. श्री संजय राठोड पालकमंत्री जिल्हा यवतमाळ तथा मंत्री, मृद व जलसंधारण, महाराष्ट्र राज्य श्री यांच्या हस्ते व डॉ.श्री पंकज आशिया (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी यवतमाळ, व श्री मंदार पत्की (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ तसेच श्रीमती लघिमा तिवारी (भा.प्र.से.) सहाय्यक जिल्हाधिकारी, यवतमाळ व तसेच जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत येणाऱ्या सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित शाल व श्रीफळ,सन्मानपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
ते 2005 ते 2017 पर्यंत जि. प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे व 2017 ते 2023 पर्यंत जि. प प. प्राथमिक शाळा वाठोडा तर 2023 पासून पुन्हा जि.प. उच्च प्राथमिक केंद्र शाळा धानोरा येथे सहाय्यक शिक्षक पदावर 19 वर्ष सेवा दिली आहे.
त्यांनी या पुरस्काराचे श्रेय राळेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी केशव पवार तसेच राळेगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजुजी काकडे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी निलेश दाभाडे व नवनाथ लहाने, तसेच धानोरा केंद्राचे केंद्रप्रमुख सुभाष पारधी, धानोरा शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विजय लांबट, शाळेतील शिक्षकवृंद रत्नमाला धुर्वे, रीना चौधरी, प्रणाली रडके, अविनाश ठाकरे, योगेश घोडे व धानोरा केंद्रातील समस्त शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समिती धानोरा तसेच धानोरा केंद्रातील टुले सरांनी सन्मान वाढविलेला आहे व या सन्मानासाठी अनेकांनी सरांना शुभेच्छा दिल्या आहे.
