
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )उमरखेड
आज दिनांक 14/08/2023 कृषी विभाग आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समिती पुसद रोड उमरखेड येथे करण्यात आले. सदरील महोत्सवा मध्ये 25 ते 30 असे विविध प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या त्या मध्ये कर्टुली, गुळवेल, बांबू, पाथरी, हडसन, घोळ, तांदूळगा, सुरज कांत, चेंडूळे, अंबाडी, माठ,नागवेलीचे पाने, तांबूळ , इत्यादी प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या विक्री करण्यात आली. सदरील महोत्सवाचे उद्घाटन मा श्री नामदेवरावजी ससाने साहेब आमदार महागाव उमरखेड विधानसभा मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. सदरील कार्यक्रमांमध्ये रानभाज्या महोत्सव न राहता लोक चळवळ राहिली पाहिजे तसेच रानभाज्याचे बियाणे उपलब्ध करून नियमित लागवडी करिता आणावे याबाबत नियोजन करावे असे आव्हान मा.आमदार महोदय यांनी केले.कार्यक्रमाला उपस्थित मा श्री भाऊराव सौंदरजी चव्हाण आत्मा समिती अध्यक्ष उमरखेड, श्री अशोकराव वानखेडे उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी, श्री गंगाधर बळवंतकर साहेब तालुका कृषी अधिकारी उमरखेड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, श्री जाधव साहेब कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव, श्री महेश्वर बीचेवार आत्मा समिती सदस्य, श्री दत्तराव शिंदे तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ,श्री रामेश्वर बीचेवार, श्री विजय हमाद साहेब कृषी अधिकारी उमरखेड,श्री जानकर साहेब मंडळ कृषी अधिकारी, श्री प्रशांत गुंडारे मंडळ कृषी अधिकारी, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राहुल कांबळे कृषी सहाय्यक व प्रकाश पवार कृषी सहाय्यक, यांनी केले.तर आभार प्रदर्शन कु. रेखा लोंढे मॅडम यांनी केले. रानभाजी महोत्सव यशस्वीतेकरता तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पोक्रा समूह सहाय्यक, सहाय्यक अधीक्षक, BTM,कृषी मित्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे नियोजन रत्नदीप धुळे बीटीएम यांनी केले.
