
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
विविधतेतून एकता ही कशी नांदेल व राष्ट्राचा देशाचा विकास कशा स्वरूपात होईल हे धोरण अखिल विश्व गायत्री परिवार शांतीतीर्थ हरिद्वार यांचा मानस नेहमीच राहिलेला आहे. व “या भारतात बंधुभाव असू दे, दे वरची असा दे” अशा स्वरूपाच्या विचाराचे बीजारोपण रोवले आणि ही मंगल कलश यात्रा दिनांक १५/११/ २०२३ ला सकाळी १०::३० वाजता ढाणकी शहरात येत असून या संपन्न होणाऱ्या सत्कर्म पुण्यरूपी नावेत आपल्या तन, मन, धनाचा, वाटा व सहयोग असावा असे गायत्री परिवार ढाणकी यांचे मार्फत आवाहन करण्यात आले आहे.
जग हे मोठ्या प्रमाणात धावपळीचे झाले असून दिवसागणिक प्रत्येक व्यक्ती कोणत्या तरी व्याधीने ग्रस्त होत चालला असताना गायत्री परिवाराने रोग निवारण, मनःशांती परिवार निर्माण, व माणसातील प्रत्येक व्यक्तीस सकारअर्थी ऊर्जा प्रवर्तित करून ते वितरित करण्याचा व एक नवे युग निर्माण करण्याचा मानस असताना ज्ञानेश्वर माऊलींनी सातशे वर्षांपूर्वी सांगितले उक्ती प्रमाणे “भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे” ही ब्रीदवाक्य जोपासण्याच्या प्रयत्नात आहे. विश्वशांती, प्राणियात्रा कल्याण, व पर्यावरण शोधन, या बाबीचा प्रामुख्याने सहभाग राहणार आहे तसेच अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंजचा सदर नियोजित कार्यक्रम असून यामध्ये १००८ कुंड वेधिय महायज्ञ शाळा, विशाल कलश यात्रा, भव्य पुस्तक मेळा, संत संमेलन, सर्व वैदिक संस्कार, भव्य दिव्य यज्ञ, असे विविध समाज उपयोगी व सांस्कृतिक कार्यक्रम असून देवकन्या सम्मेलन आहे शिवाय ८० देशातील भाविक भक्ताची हजेरी राहणार हे विशेष. वरील ईश्वर भक्तीचे आयोजन व संतभूमी म्हणून संपूर्ण भारताला परिचित व विशेष ओळख असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचून व हाती घेतलेले व्रत पूर्णत्वास जाण्याकरिता ग्रामप्रदक्षणा राष्ट्रीय जागरण भव्य मंगल कलश यात्रा २७/ १०/ २०२३ ते १५ जानेवारी २०२४ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करणार आहे. व ही यात्रा विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व अन्न हे परब्रम्ह आहे अशी शिकवन देणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या तीर्थक्षेत्र येथून सुरु झाली आहे. रथा मधील कलशा मध्ये भारत देशातील २४०० तीर्थाचे पवित्र गंगाजल व २४००तिर्थावरील यज्ञाचे भस्म स्थापन केले आहे. अशी ही पुण्यपावन असलेली कलश यात्रा ढाणकी शहरात येत असून यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन गायत्री परिवार यांनी केली आहे तसेच ज्यांना भोजन शाळेकरिता लागणारे अन्नधान्य सुद्धा दान स्वरूपात करण्यात येईल व देणगी स्वरूपात दान करण्याची व्यवस्था सुधा आहे.त्यामुळे ज्यांना अशा स्वरूपात सत्कर्म करावयाचे असल्यास त्यांनी विष्णूदास वर्मा,नाथाजी येरावार व प्रमोद चौधरी गुरुजी यांच्याशी संपर्क करावा असे प्रसिद्धी पत्रकातून आवाहन करण्यात आले आहे.
