

वरोरा तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या
बोर्डा सुर्ला ग्रामपंचायत मध्ये 2021 साली झालेल्या निवडणुकीत 3 अपक्ष तर उर्वरित 10 सदस्य एकाच पॅनल मधून निवडून याआल्यानंतर सर्वानुमते सरपंच म्हणून ऐश्वर्या खामणकर तर उपसरपंच म्हणून राहुल ठेंगणे यांची निवड करण्यात आली होती .कधी विकासकामे ,तर कधी आर्थिक बाबीच्या अडथळा आल्यामुळे राहुल ठेंगणे यांच्यासह इतर सदस्य यांनी तहसीलदार योगेश कोटकर यांना अविश्वास ठराव घेण्यासाठी नोटीस देण्यात आला होता .त्यानुसार १३सदस्य संख्या असलेल्या सदस्या पैकी दहा सदस्यांनी सरपंच यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला. तो ठराव दहा- दोन या मताने पारित झाला. बोर्डा सूर्ला या ग्रामपंचायत मध्ये एकूण संख्याबळ तेरा असून सरपंच ऐश्वर्या खामणकर, यांच्यासोबत काटकर मॅडम असे दोनच मतदान होते,तर विरोधी पक्षाकडे दहा सदस्यांनी राहुल ठेंगणे ,रवींद्र देसाई , गोपिका परचाके, प्रतिभा जिवतोडे, भाग्यश्री इंगळे,नंदा हिवरकर, प्रिया भोयर, आनंदराव वानखडे , रवींद्र बगडे, भूषण बुरीले अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान केले तर एक तटस्थ राहिला, पंचावर सरपंचावर सभेला विश्वासात न घेता कामे करणे, मनमानी करणे, शासकीय आर्थिक कामाला नियोजनाला व्यवहाराला विलंब करणे, ग्रामपंचायत मधील कामाला अडथळा निर्माण करणे असा ठपका विरोधकांनी ठेवला होता. सरपंच विरोधात अविश्वास ठराव साठी म्हणून निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली होती यावेळी कोणतीही अनुचित घटना येथे घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता सभेला तहसीलदार तलाठी ग्रामसेवक ताजने व ग्रामपंचायत कर्मचारी हजर होते.
एका माजी सरपंचाची लुडबुड ,अंतर्गत कलह ठरला कारणीभूत
ऐश्वर्या खामानकार, माजी सरपंच
