
सहसंपादक: रामभाऊ भोयर
महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर अनुदान द्यायचे शासनाने कबूल केले होते पण अजूनही अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याने हे अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशा आशयाचे निवेदन राळेगाव ग्राविकाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. शिवसेना जनसंवाद मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राळेगाव येथे आले होते स्थानिक बाजार समितीमध्ये त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांना हे निवेदन देण्यात आले नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी सन्मान योजना 2019 अंतर्गत 50 हजार रुपये अनुदान द्यायचे ठरले होते काही शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले ही पण या योजनेला चार वर्ष लोटून अजूनही राळेगाव ग्राविकाच्या 99 कर्जदार सभासद हे या योजनेपासून वंचित आहेत या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर यावर्षी शेतकऱ्यांचे अवस्था ही दयनीय आहे कोणत्याही शेतमालाचे समाधानकारक उत्पन्न नाही तसेच शेतमालाला भावही नाही सोबतच अनेक शेतकरी हे अजूनही पिकविम्या पासून वंचित आहे अशा वेळेस शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे त्यामुळे आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्यावे अशी साद राळेगाव ग्राविकाच्या वतीने उद्धव ठाकरे यांना घालण्यात आली निवेदन देताना राळेगाव ग्राविकाचे अध्यक्ष सचिन हुरकुंडे उपाध्यक्ष राजेश काळे संचालक जानराव गिरी कृष्णराव राउळकर विनायक नगराळे तातेश्वर पिसे अशोक पिंपरे गजानन पाल विनोद नरड प्रभाकर राऊत गजानन महाजन विभा गांधी ज्योती डाखोरे आदी उपस्थित होते.
