हिमायतनगर शहरातील मुख्यरस्त्यावर मोकाट जनावरे रस्त्यावर,मुख्याधिकारी यांचे साफ दुर्लक्ष

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

हिमायतनगर शहरातील मुख्यरस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणात मोकाट असलेले गाय,बैल,रेडा,वासरु वळु,गाढवे,शेळ्या,मेंढ्याआदि अनेक लहान-मोठे जनावरे शहरातील परमेश्वरमंदिरासमोर,कमानीसमोर,बाजार रोड वर,चौपाटी परिसर,किनवट-भोकर राष्ट्रीय महामार्गावर,उमर चौक,डॉ.आंबेडकर चौक,बसस्थानक परिसरात,पळसपुर रोडवर,पारडी रोडवर,सदाशिव मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आदी परिसरात या ठिकाणी पाच ते दहा जनावरांचा कळप नेहमीच या ठिकाणी रस्त्यावर येऊन बसतअसतो.तर रस्त्यांच्या मधोमध चालत असतो,त्या भरस्त्यावर जनावराचा कळप उभा टाकून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारक,प्रवासीवर्गाला पायी चालणाऱ्या वृद्धांना,महिलांना,पुरुष तर शाळकरी लहान मुलां-मुलींना याचा दररोजच नाहक त्रास होतआहे.तर हा कळप वाटतच उभाअसल्याने शहरातील रस्त्यावरून तीन चार चाकी वाहन घेऊन जात असताना,या वाहनांना धडक देऊन लहान-मोठेअपघाताचे प्रमाण दररोज दररोजच होतआहे.मोकट जनावरांमुळे शहरासह तालुक्यातून आलेल्या प्रवासीवर्गांना सुद्धा यांचा नाहक त्रास नेहमीच होतआहे.मोकाट जनावरांना नगरपंचायतीच्या सार्वजनिक जनावरे कोंडण्यासाठी कोंडवाडा बंद किंवा कोंडवाडाच उपलब्ध नसल्याने या ठिकाणी जनावरे कोठे कोंडावे?असा प्रश्न निर्माण झालेलाआहे. नगरपंचायतीने कोंडवाड्यांसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण सांगून जनतेला नाहक त्रास देण्याचे काम नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे करीत असल्याचा गंभीर आरोप येथील जनता बोलून दाखवतआहे.शहरात मोकाट जनावरामुळे नेहमीच ट्राफिक जामचा सुद्धा त्रास होऊन किमान अर्धा-अर्धा तास तरी रहदारी व्यवस्थित सुरळीत होण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची प्रतिक्रिया पीआय बी.डी.भुसनुर यांनी बोलून दाखविले आहे.नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी जनावराच्या कोंडवाड्या विषयी गंभीरपणे लक्ष घालून हा विषय सोडविण्याचां असताना हा विषय नेहमीच रेंगाळतअसल्याने जनतेला यांचा नाहक त्रास होतआहे.कोंडवाडा नसल्यामुळे मोकाट जनावरे रस्त्यावर येऊन कोणाचा तरी बळी येणाऱ्या काळात घेतल्या जाईल का?यांची जबाबदारी कोण घेणार आहे?असा सुद्धा उलट प्रश्न शहरातील सुजाण नागरिकांतून व्यक्त होतआहे. शहरातील एखाद्या जबाबदार नागरिकांचा बळी जावाआणि कोंडवाड्याचा प्रश्न सुटावा का? असाही प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.येणाऱ्या काळात जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू किंवा जबर दुखापत झाली,तर शहरवासियांना या नगरपंचायतीला जबाबदार धरून नगरपंचायतीवर भारतीय दंड कायद्या प्रमाणे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा सुद्धा दाखल करता येते.अशी ही काही विधीतज्ञाच्यां कायदेशीर सल्ल्या मधून हा प्रश्न निकाली काढण्यासाठी पर्याय उपलब्ध असणार असल्याचा सुद्धा शहरातील नागरिक यावेळी बोलून दाखवतआहे.येणाऱ्या काळात मोकाट जनावरांचा प्रश्नकोंडवाड्यामुळे आणखी चिघळतंच जाणारअसल्याचे या प्रकारावरून दिसून येतआहे.