
प्रतिनिधी :लता फाळके /हदगाव
हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात मागील आठवड्यापासून झालेल्या मुसळधार पावसाने अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकाची मोठी हानी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी व्यथा जाणून घेत पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
या अतिवृष्टीमुळे मतदारसंघात हाहाकार झाला असल्याने शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीत मदत मिळावी यासाठी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी मुंबई गाठत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन मतदार संघातील पिकांच्या नुकसानीची माहिती देऊन मदतीची मागणी केली. नुकसानग्रस्त पाहणी दरम्यान
महिला काँग्रेसच्या नेत्या डॉ. रेखाताई चव्हाण, तालुका अध्यक्ष आनंद भंडारे, आनिल पाटिल ,माजी जिल्हा परिषद सदस्य पंजाबराव पाटील, करमोडी येथील माजी सरपंच अनिल पवार, जिल्हा परिषद सदस्य के सी सूर्यवंशी, श्रीनिवास मस्के, माजी नगरसेवक बाबू अण्णा पीच्केवार, संदीप काळबांडे, नगरसेवक फिरोज पठाण, आनंदराव मस्के, दशरथ मिजगर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष संदीप शिंदे, यांच्यासह तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तदनंतर आमदार जवळगावकर यांनी हादगाव तालुक्यातील कर्मोडी, मारलेगाव, तालंग, उंचाडा, हस्तरा, धानोरा, बोरगाव, धानोरा, रुई, गोरलेगाव, बाभळी, आदी पूरग्रस्त भागांना भेटी देऊन शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांचा या भेटीदरम्यान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी पिक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची संवाद साधून सविस्तर अहवाल जाणून घेतला.
पिकाच्या आनेवारी संदर्भात आमदार जवळगावकर म्हणाले की प्रशासनातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जी पणामुळे पिकाची पाहणी न करता आणेवारी निश्चित केल्याचे निदर्शनास येताच उपविभागीय अधिकाऱ्यांना सुधारित आनेवारी करण्याच्या प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले असल्याचे आमदार जवळगावकर यांनी शेतकऱ्यांना बोलताना सांगितले.
पूरग्रस्तांची पाहणी करत असताना आमदार माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले की मतदार संघातील हजारो हेक्टर जमिनी पाण्याखाली जाऊन खरडून गेल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना सावरण्याची वेळ असून मतदार संघातील शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचेही आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी बोलताना सांगितले.
चौकट
आणेवारी ची चिंता करू नका- आमदार जवळगावकर
.
मतदार संघात मोठ्याप्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतरही प्रशासनाच्या अभिलेखावर 50% च्यावर आनेवारी दाखवण्यात आल्याने शेतकरी बांधवा मध्ये संतप्त भावना निर्माण झाल्या होत्या वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत होते त्यामुळे तात्काळ आणेवारी प्रक्रियेत सुधारणा करण्याचे पत्र उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगत आनेवारी ची चिंता करू नका असेही आमदार जवळगावकर यांनी शेतकरी बांधवांना बोलताना सांगितले.
