
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील गावाच्या सभोवताली एका बाजूला नाला असून नविन वस्तीला लागून शेत आहे.या नाल्याची काहीतरी थातुरमातुर पद्धतीने डाग डुगी केली असून नाला संपूर्ण रूंदीकरण व सरळीकरण करण्यात आला नसल्याने नाल्यात खूप मोठ्या प्रमाणात कचरा झाडं झुडपं झाली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी याच तरूणांनी मंदिरासमोर अजगर जातीचा साप पकडला होता आणि आता परत वरूड जहांगीर येथील वार्ड नंबर एक मधील विठ्ठल ठाकरे यांच्या जनावरांच्या गोठ्यात आज सकाळी अजगर जातीचा साप पकडला असल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून सदर ग्राम पंचायतीने नाल्यांची सफाई करतांना संपूर्ण स्वच्छता केली असती तर कदाचित हा प्रसंग उद्भवला नसता करीता ही गोष्ट गांभीर्याने घेऊन गावाच्या सभोवताली तणनाशक फवारणी करून स्वच्छ करावा सोबतच संपूर्ण गावातील स्ट्रीट लाईट सुद्धा नियमित सुरू राहील याची दक्षता घ्यावी. अशा एक ना अनेक प्रश्न ग्राम पातळीवर अपूर्ण असून आतापर्यंत दोन अजगर जातीचे साप पकडले असून अजूनही काही अजगर आहे का अशी शंका व्यक्त केली जात असून नाल्यांची सफाई युद्ध पातळीवर करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत असून अजगर जातीचा साप पकडण्यासाठी सचिन आत्राम, रितेश कोवे, राजकुमार आत्राम, महेंद्र बावणे,रोहन कोवे, सुमित ढगे यांनी अथक परिश्रम घेऊन या घरमालकाला भयमुक्त केले असल्याने विठ्ठल ठाकरे यांनी वरील तरूणांचे आभार मानले आहेत.
