
सहसंपादक -रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद कन्या शाळा व मुलांची शाळा खैरीचे वतीने मंगळवार,२८एप्रिल रोजी शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. शाळापूर्व तयारी मेळाव्यात मुलांना जिल्हा परिषद शाळेत का टाकावे, आपली शाळा जिल्हा परिषद शाळा, शिक्षणाचे महत्व काय याची माहिती शाळा पूर्व तयारी मेळाव्यात देण्यात आली.
२०२३-२४ वर्ग पहिली चे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विद्यार्थी प्रवेशाबाबतची माहिती देण्यात आली. त्यासाठी विविध स्टॉलच्या माध्यमातून नाव नोंदणी, वजन उंची रिपोर्ट कार्ड देणे, शारीरिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक व भावनात्मक विकास, भाषा विकास, गणपूर्व तयारी, मार्गदर्शन व साहित्य वाटप असे स्टॉल लावून माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल वानखेडे, सदस्य गुलाबराव इंगोले, शाळेचे शिक्षक संजय खडसे मुख्याध्यापक, संदीप आडे प्र.मु. कन्या शाळा, सुरेश सलाम, प्रवीण दीडपाये, राजेंद्र दूरबुडे , वसंत खाडे, जितेंद्र करमनकर, हनुमंत इरखडे ,शेंडे यांच्यासह पालक वर्ग गजानन सवाई, ज्ञानेश्वर खैरकर, उमेश हरबडे ,अतुल आसुटकर ,संदीप नारनवरे, गीता नारनवरे, सविता सिरामे , प्रणाली सोनटक्के, कोकिळा सोनटक्के, जया नारनवरे यांच्यासह गावातील पालकांची उपस्थिती होती.
