
सहसंपादक : रामभाऊ भोयर
श्री गुरुदेव सेवा मंडळ,राळेगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दि.11 मे ते 21 मे 2024 मुलामुलींसाठी बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .या निवासी संस्कार शिबिरातून विद्यार्थ्याच्या आत्मविश्वास , आदर्श व्यक्तिमत्व , आईवडिलांचा मानसन्मान , आत्मनिर्भरता , निडरता , आत्मिक सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी बाल सुसंस्कार शिबिर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचार प्रणाली नुसार ‘आजच्या लहान लहान बालकावर लहानपणीच उच्च संस्कार मिळावे निवासी शिबिराच्या माध्यमातून मानवतेची शिकवण समता , बंधुभाव , राष्ट्रीयता , देशप्रेम , या भारतात बंधुभाव नित्य वसावा यासाठी नित्य सौख्य प्राप्तीसाठी विद्यार्थ्यांना उज्वल प्रगतीची वाटचाल आदर्श विचार आत्मसात करून खरा माणुसकीचा पाया निर्माण व्हावा.बाल
सर्वागीण सुसंस्कार शिबिरातील तत्वप्रणालीतून मुलांचा आत्मविश्वास दृढ होतो झाडगाव येथील शिबिरात मुलानं मुलींना
१ ) व्यक्तिमत्त्व विकास , स्व स्वावलंबन
२ ) संगीत, गायन वादन ( प्राथमिक माहिती )
३ ) योगासन प्राणायाम
४ ) स्वरक्षणार्थ लाठी – काठी – कराटे
५ ) ब्रेन डेव्हलप मेडीटेशन
६ ) बौद्धिक जनरल नॉलेज, वक्तृत्वकला, शारीरिक शिक्षण
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ‘ आजचे सान सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचा पांग फेडतील उत्तोमत्तम गुणांनी ‘ या शिबिराला प्रबोधनकार , किर्तनकार , विचारवंत, साहित्यिक , वैज्ञानिक, तंत्रज्ञ अनुसंधानिक , डॉक्टर्स शिबिराला विशेष मार्गदर्शन मिळाले तसेच लाठीकाठी, कराटे, योगासन, प्राणायाम, संगीत गायनासाठी प्रशिक्षक, अध्यापक, प्राध्यापक यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली शिबीरार्थीना मार्गदर्शन करून समारोपप्रसंगी मुलांना
प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आलेत.या कार्यक्रमा करीता अध्यक्ष म्हणून *मा. पद्माकर ठाकरे, जिल्हा सेवाधिकारी,
शेरअली बापू लालाणी, आशिष इंगळे,प्रथम फाउंडेशन,डॉ. ज्ञानेश्वर मुडे, निर्वाचन अधिकारी,घनश्याम फ़टिंग तालुका सेवाधिकारी, सचिन झाडें, उपसर्वाधिकारी, अरुण खंगार, विनोद देवतळे, नामदेव वाढई, अंबादास लालसरे, रमेश विलायतकर, शरद केवटे, गोपाल भटकर,उमेश गौळकार, किशोर कांडुरंवार, नाटक कळंब, उल्हास देशपांडे, सावंत सर, शुभम सर, गुलाबराव पाल, सतीश पाटिल, प्रकाश झलके, शंकर बेहरे, या समारोप शिबिराचे सूत्रसंचालन रुपेश रेंघे यांनी केले तर आभार हरिदास कुबडे यांनी करून राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
