कोष्टी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

ढाणकी/ प्रतिनीधी : प्रवीण जोशी

कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था वडगाव रोड यवतमाळ, यांच्यावतीने दरवर्षी कोष्टी समाजातील यवतमाळ जिल्ह्यातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेन्यात येतो. पण मागील दोन वर्षाच्या कोरोना काळामध्ये घेण्यात आला नाही. तो कौतुक सोहळा दि. ३०/१०/२०२२ रोजी दुपारी १ वाजता ज्येष्ठ नागरिक भवन, बालाजी सोसायटी, महादेव नगर यवतमाळ येथे सत्र २०२०, सत्र २०२१, सत्र २०२२ मध्ये उत्तीर्ण झालेल्या वर्ग १० व १२ वी च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा, कोरोना योद्धा,इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तीचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध संपन्न झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र खोडवे अध्यक्ष कोष्टी समाज बहुउद्देशीय संस्था यवतमाळ, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कोष्टी परिषदेचे महासचिव नारायणराव वड्डे सर, प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ.प्रमोद गारोडे परतवाडा,विलासराव भड अखिल महाराष्ट्र कोष्टी परिषद उपाध्यक्ष कार्यक्षेत्र विदर्भ व नागेश रातोळे अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज यवतमाळ जिल्हा संघटक, कोष्टी समाज ढाणकी शहराध्यक्ष तथा भाजपा ढाणकी शहर उपाध्यक्ष हे उपस्थित होते.
यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांकडून सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.