अतिवृष्टीने पिकांचे झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई व नाला खोलीकरण व सरळीकरण देण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात २१ जुलै २०२३ झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे तसेच वाऱ्हा आष्टा रोडवरील असलेल्या नाल्याला पूर येऊन शेकडो एकर शेतातील पिके खरडून गेली व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नुकसान झाले त्यामुळे राळेगाव खंड-१ येतील शेतकऱ्यांनी दिं २७ जुलै २०२३ झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी व नाला खोलीकरण व सरळीकरण करून देण्यात यावे अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात देण्यात आले.
मागील वर्षी जुलै ऑगस्ट मध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्या वेळी सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या नुकसान झाले होते तेव्हा मा. उपविभागीय अधिकारी पूर पाणी केली असता उपविभागीय अधिकारी यांनी शासनाच्या जलयुक्त शिवार योजने अंतर्गत नाला खोलीकरण व सरळीकरण करून ही समस्या सोडवू असे आश्वासन दिले होते. त्याकरिता राळेगाव नगरपंचायत कार्यकारणीने सर्वसाधारण सभा दिं २९ऑगष्ट२०२२ (ठराव क्रमांक ३३ रोजी जलयुक्त शिवार योजनेतून नाला खोलीकरण व सरळीकरण करणे बाबत ठराव करून मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ, मा.उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन सादर करण्यात आले. परंतु यावर कुठल्याही प्रकारे उपाययोजना करण्यात आली नाही.जर प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष दिले असते तर यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले नसते. तेव्हा आतातरी प्रशासनाने लक्ष देवून
यावर्षी जलयुक्त शिवार योजने अंतर्गत यवतमाळ रोड पासून कळमनेर पर्यंत सदर नाला (केनाडी) खोलीकरण व सरळीकरण करण्यात यावे निदान तरी पुढल्या वर्षापासून नाल्याचे बाजूच्या शेताचे पुरामुळे होणारे नुकसान टाळता येईल तसेच दिं २१ जुलै २०२३ रोजीच्या अतिवृष्टीने व पुरामुळे नाल्याचे आजूबाजूला असलेल्या शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शहानिशा करून भरीव आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी निवेदनातून केली असून राळेगाव खंड १ मधील शेतकरी जानराव वामन गिरी, सौ मंगला जानराव गिरी, प्रतीक रामकृष्ण बोबडे, मोहिनी प्रतीक बोबडे, सौ अन्नपूर्णा पुरुषोत्तम पाल, पुरुषोत्तम पाल, राहुल होले, प्रदीप लोहकरे अंकित कटारिया, सचिन हूरकुंडे,गजानन पाल, आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते