

फुलसावंगी प्रतिनिधी : संजय जाधव ,महागाव
फुलसावंगी दोन कनिष्ठ महाविद्यालयाला दि. १३ बुधवार च्या रात्री चोरांनी लक्ष बनवित महाविद्यालयात तोडफोड करुन नुकसान केले.
बुधवारी स्व. सुधाकरराव नाईक व शिवरामजी मोघे या कनिष्ठ महाविद्यालयाची कार्यालयीन वेळ संपल्यानंतर दोन्ही महाविद्यालय कर्मचारी व्यवस्थीत बंद केले होते. परंतु आज सकाळी महाविद्यालय उघडल्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांच्या क. महाविद्यालयात चोरी करण्याचा प्रयत्न होऊन तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले. यामध्ये स्व. सुधाकरराव नाईक क. महाविद्यालयांच्या कार्यालयाचे कुलुप तोडून दोन्ही कपाटाची तोडफोड करुन कागद पत्रे अस्ताव्यस्त केली तसेच प्राध्यापकांच्या लाॅकर चीही तोडफोड करुन कागद पत्रे अस्ताव्यस्त केली. असाच प्रकार शिवरामजी मोघे क. महाविद्यालयातही केला येथील ही प्राध्यापकांच्या लाॅकरची तोडफोड करुन कागद पत्रे अस्ताव्यस्त केली. यामध्ये तिस हजाराचे नुकसान दोन्ही क.महाविद्यालयाचे झाले आहे. सदर घटनेची फिर्याद प्राचार्य विनोद राठोड व प्राचार्य सुधिर भाटे यांनी महागाव पोलिस स्टेशनला दिली आहे. घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास जमादार निलेश पेंढारकर करत आहेत.
