केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूराचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी राळेगाव येथील काॅंग्रेस पक्षाने दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

आपल्या देशातील केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात आताच नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकरी व शेतमजूर यांच्या तोंडाला पाने पुसली असून शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची आर्थिक तरतूद केली नाही यावरून निश्चितच लक्षात येते की महाराष्ट्र सरकारच्या नियतीत खोट असून शेतकरी आणि शेतमजूर अत्यंत हालाखीचे जीवन जगत असून याकरीता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी आज दिनांक २६/७/२०२४. रोज शुक्रवारी ठीक एक वाजता उपविभागीय अधिकारी राळेगाव यांना निवेदन देण्यात आले असून मागण्या खालील प्रमाणे असून (१)शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी.(२) शेतकऱ्यांना सरसकट पिकविमा देण्यात यावा. (३)मजूराना त्वरित रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.(४) घरकुल आणि सिंचन विहीरीचे पैसे ताबडतोब देण्यात यावे. अशा प्रकारे मागणीचे निवेदन देण्यात आले असून निवेदन देताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे , शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मिलिंद इंगोले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अंकुश मुनेश्वर, उपनगराध्यक्ष जानराव गिरी, नगराध्यक्ष रविंद्र शेराम, सोसायटी अध्यक्ष सचिन हुरकुंडे, राजेंद्र ओंकार, मंगेश पिंपरे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सनी छोरीया, सुरेश पेंद्राम, अशोक काचोळे, पुरुषोत्तम कोपरकर,श्रीधर थुटुरकर,कुंदन कांबळे, विजय किन्नाके,अफसर अली सैय्यद, ज्ञानेश्वर सिडाम, सुवेध भेले, सदानंद भोरे, नितीन पेंदोर, हेमंत तागडे,अभिलाष उमरे, भानुदास राऊत, विक्की इंगळे, पुरुषोत्तम चिडे, श्रावनसिंग वडते सर, रामधन राठोड, अशोक पिंपरे,मोहन नरडवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धवल घुंगरूड इत्यादी काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.