
पोंभूर्णा तालुका प्रतीनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा:- तालुक्यातील चक नवेगाव येथील तरुणाचा थ्रेशर मशीन मध्ये अडकून दुदैवी मृत्यू झाला आणि त्याचा कुंटूबच नाही तर संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला मन हेलावून टाकणारी हि घटणा… बेरोजगारीने जनू आजारा सारखं युवापिढीला ग्रासल आहे मिळेल तो काम करून आपला नि कुंटूंबाचा उदरनिर्वाह करायचं हि आजची वस्तुस्थिती आहे सध्या ग्रामीण भागात रब्बी हंगामातील पीक बहरून आलं असून थ्रेशर मशीनच्या माध्यमातून धान्य मळणी सूरू आहे पोटाची खळगी भरण्यासाठी चेक नवेगाव येथील तरूण महेश अरुण लोहे वय वर्ष २३ हा नेहमी प्रमाणे थ्रेशर मशीनवर पीकाची मळणी करन्याकरीता कामावर गेला मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं काम करीत असताना दुदैवानी त्याचा तोल मशीन मध्ये गेला आणि जीवणाचा करूण अंत झाला कुंटूबंच नव्हे तर संपूर्ण गाव शोकसागरात बूडाला महेश हा कुंदूंबातील कर्ता पुरुष होता आणि अचानक त्याच्या अशा निघून जान्यानी कुंटूबावर दुखःचे डोंगर कोसळले असून गावात सर्वत्र दुखःचे सावट पसरले आहे….
