भालेवाडी गावातील प्रवाश्यांना गारपीट बस मध्ये प्रवेश द्या; विद्यार्थ्यांची मागणी

:- तहसिलदार मार्फत पाठविले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कारंजा (घा):- तालुक्यातील भालेवाडी गावातील प्रवाश्यांना गारपीट बस मध्ये प्रवेश द्या या मागणीचे निवेदन दिनांक १५/११/२०२२ रोज बुधवारला संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष पीयूष रेवतकर यांच्या नेतृत्त्वात कारंजा येथील तहसीलदार गिरी मार्फत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे पाठविण्यात आले. दिवाळी आगोदर दुपारी ५ वाजता कारंजा येथून भालेवाडीकरिता जाणारी बस गावात ५:३० वाजे पर्यंत वेळेवर पोहचायची परंतु दिवाळी नंतर ही बस कारंजा येथून खूप उशीरा निघतो त्यात जास्तीत जास्त शालेय विद्यार्थी प्रवास करतात.खूप वेळाने निघत असलेल्या या बसमध्ये कारंजा येथे शालेय शिक्षण घेण्याकरिता येणारे विद्यार्थी आपल्या गावाला वापस जात असतात परंतु बस निघायला होत असलेल्या वेळेमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्रास होत आहे .थंडीचे दिवस सुरू आहे यामुळे सुद्धा विद्यार्थ्यांना घरी जायला खूप त्रास होत आहे. विशेष म्हणजे बस मध्ये विद्यार्थिनी जास्त संख्येने प्रवास करतात ,पालकांना सुद्धा त्यांची काळजी होतात. त्यामुळे कारंजा बस डेपोमधून भालेवाडी रोडवरून जाणाऱ्या गारपीट बस मध्ये भालेवाडी येथील प्रवाश्यांना प्रवेश द्या अशी मागणी शालेय विद्यार्थ्यांनी केली आहे.संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष पीयूष रेवतकर यांना ही समस्या कळताच त्यांनी गावातील विद्यार्थ्यांशी चर्चा करून तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारीकडे निवेदन पाठविले यावेळी निवेदन देताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष पीयूष रेवतकर,चेतन चौधरी, उदय कडवे,महेश चौधरी, योगेश कडवे, आकाश दुपारे, मिलिंद बैगणे, सुजित ढोबाळे,शुभम दुपारे,संकेत चौधरी, दिपेश कडवे आदी इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.