
वरोरा शहरातील जिजामाता वॉर्ड ,बावणे ले आऊट जवळ असलेल्या संकटमोचन हनुमान मंदिर परिसरात काल रात्री उशिरा दोन गटात घडलेल्या हाणामारीत अमोल बोरकुटे (25)व प्रशांत झाडे (25)हा गंभीर जखमी झाले.ही घटना रात्री 12.30 च्या सुमारास दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी घडली.
जिजामाता वॉर्ड येथील रहिवासी अमोल बोरकुटे हा मंदिराच्या जवळच राहतो .घटना घडल्यानंतर अमोल जखमी अवस्थेत स्वतः चालत जात घरी पोहचला .घटनेचे गांभीर्य ओळखून आई ,वडील व भावाने अमोल ला जखमी अवस्थेत उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्यात आले.तर अमोल बोरकुटे व प्रशांत झाडे याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास त्वरित चंद्रपूर येथे हलविण्यात आले. प्रशांत झाडे हा घरचा सदन असून अमोल रोज मजुरीचे काम करायचा.झाडे याचे काही दिवसांपूर्वी प्रफुल नावाच्या व्यक्ती सोबत भांडण झाले होते.त्या भांडणाचा वचपा म्हणून तर ही घटना घडली असावी असाही तर्क लावल्या जात होता तो तर्क अखेर खरा ठरला आहे .
वरोराशहराजवळ असलेल्या एकार्जुना येथील राकेश टोंगे, आशिष थेरे व धानोली येथील रहिवासी असलेला प्रफुल ठक या तिघांनी त्या रात्री वाद घालत लोखंडी रोड च्या साहाय्याने मारहाण केल्याचा जबाब जखमींना नोंदविला .त्यानुसार तिन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहेत. आरोपीना पोलीस कोठडीत रवाना करण्यात आले.
