
प्रवीण जोशी प्रतिनिधी
ढाणकी
ढाणकी शहरातील पंकज बालाजी चिंचोलकर या तरुणाची सहाय्यक कक्ष अधिकारी (मंत्रालय) ही परीक्षा पास झाल्यामुळे त्याची ही निवड झाली. अत्यंत अवघड असलेल्या परीक्षेमध्ये मोजकेच विद्यार्थी पास होतात त्यात पंकज ही परीक्षा उत्तीर्ण झाला. जिद्द महेनत ध्येय ठरवून केलेले कर्म यावरून हे यश पंकजला मिळाले सर्वसाधारण मध्यमवर्गीय परिस्थिती कुटुंबातील एवढ्या उच्चपदस्थ ठिकाणी कोणीही नसताना त्याने अचूक निर्णय व योग्य समय सुचकतेला अनुसरून घेतलेल्या वेळोवेळी निर्णयाची परिनीती म्हणून तो आज अवघड यशाचा शिखर सर करू शकला. सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासोबतच त्याची राज्य कर निरीक्षक व कर निर्धारण अधिकारी (नगर परिषद) ह्या पदांवर सुद्धा निवड झाली आहे .हे सगळे करत असताना परीक्षेच्या व मोक्याच्या क्षणी वडिलांचे निधन झाले पण त्याने अभ्यासावर या बाबीचा परिणाम कधीही होऊ दिला नाही.
वडीलाचे एक स्वप्न होते ते म्हणजे पंकज ने अधिकारी व्हावे पण ते सत्यात उतरवणे सोपे नव्हते. ध्येयाची आस पंकजला स्वस्थ बसू देत नव्हती व त्यांने प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण केली हे विशेष त्याचे प्राथमिक शिक्षण ढाणकी शहरातील गुलाब सिंह ठाकूर प्राथमिक शाळेत झाले तर उर्वरित शिक्षण नामांकित शिक्षण संस्था असलेल्या स्वामी पेंडसे गुरुजी विद्यालयात झाले तिथे सुद्धा त्याने दहाव्या वर्गात आपल्या गुणवत्तेची चूनुक दाखवत प्राविण्यसह उत्तीर्ण झाला व पुढील शिक्षण नूतन कॉलेज जळगाव येथे घेऊन एम. एस. सी फिजिक्स नांदेड येथे केले याआधी त्यांनी विविध परीक्षा दिल्या व तो त्यामध्ये उत्तीर्ण सुद्धा झाला पण तो स्वस्थ बसला नाही व जे पाहिजे त्यात यश प्राप्त केले.यावरून स्वतःबद्दल किती आत्मविश्वास व ध्येयाप्रती सकारात्मकता होती हे दिसते त्याच्या यशाचे श्रेय तो आई व भावाला देतो.. तसेच वेळोवेळी मदत करणारे व शिक्षणाचा सारा भार उचलणारे त्याचे मामा मोहन वाकोडे व मामी सुरेखा यांचा मोलाचा वाटा असल्याचेही तो यावेळी सांगतो.त्यांच्या आशीर्वाद रुपी मार्गदर्शनामुळेच हे सिद्ध झाले व एक ग्रामीण भागातील व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाने मिळवलेल्या या यशामुळे अनेक तरुणांना यातून प्रेरणा मिळेल.
