
प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ
सुशिक्षित बेरोजगाराच्या दृष्टीने हिरडा, बेहडा, आवळा, याचबरोबर मोहफुलही तितकेच महत्वाची आहे. मोह हे आदिवासी भागातील लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधनच,त्यामुळे मोहाला आदिवासी बांधव महत्वाचे स्थान देतात. या मोहफुलाच्या झाडाला काही आदीवासी जमाती लोक देव मानतात. या झाडाखाली त्यांचा देव मांडतात. बहुतेक आदिवासींचे जीवन व त्यांचे सन, धार्मीक कार्यक्रम या झाडाच्या फुलापासुन बनविलेल्या दारु शिवाय पुर्ण होत नाही. होळी सन साजरा करून मोहफुल गोळा करण्याला सुरुवात करतात. ती वाळवून, साठवून ठेवतात. रोख पैशांची गरज असेल तेव्हा बाजारात विकतात.
खऱ्याअर्थाने कोणालाही ” मोह पडावा ” व आपला जास्तीत जास्त संकलन व्हावा असे आदिवासी झाडीपट्टीतील संपुर्ण लोकांना वाटतात. सध्या मोहवृक्ष फुलांनी बहरलेले असून,या मोह फुलाच्या संकलनातून अभयारण्य तसेच जंगलालगच्या ग्रामीन नागरीकांना हंगामी रोजगार उपलब्ध होत आहे. तथापी मोह फुल हे बहुपयोगी वृक्ष असल्याने त्याला आदिवासी भागात कल्पवृक्ष मानले जाते. मोहफुल व बियांपासुन शरबत,जॅम, जेली, तेल असे विविधपुर्ण पदार्थ तयार केले जातात, परंतु केवळ हातभट्टीच्या दारुमुळे मोह फुलाकडे उपेक्षी दृष्टीने बघितले जाते.
एकट्या ढाणकी परिसरात लाखोंची उलाढाल
तालुक्यात भरपूर प्रमाणात मोहवृक्ष आहेत. दरवर्षी लाखोंची उलाढाल मोहफुल संकलनातून होते. दरवर्षी मार्च महिन्यात ते बहरतात. एका झाडापासुन जवळपास ५० किलो मोहफुल मिळतात. हि फुले साधारणतः ३० ते ४५ रुपये प्रती किलो दराने विकली जातात, एकट्या झरी तालुक्यात या झाडापासुन शेकडो क्विंटल मोहफूल प्रतिकिलोने
हिशोब केल्यास हा आकडा लाखोच्या वर जातो.लाखोंच्या घरात मोहफुलांचे उत्पादन होत असले तरी विदर्भात त्यावर आधारीत एकही प्रक्रिया उद्योग नाही. राज्यात ऊस, द्राक्षांपासुन दारु तयार केली जाते, त्या दारुला शासनाची मान्यता आहे. परंतु हिच दारू मोह फुलापासुन तयार केली तर त्याला शासनाकडून मान्यता मिळत नाही. हा विरोधाभास आहे ग्रामिण भागात मोह फुलापासुन दारू निर्मीती व विक्री केली जाते. मान्यता व महसुल मिळत नसल्याने शासनाच्या लेखी ती अवैध असली तरी त्यातुन हजारो लोकांचा प्रपंच चालतो हे तितकेच कटू वास्तव आहे*
मोहफूलाला आयुर्वेदिक औषधीचा दर्जा
मार्च महिण्यात येनाऱ्या मोहापासून साबण आणि तेल देवाधर्मात,औशधात मोहफुलाचा फार उपयोग होतो. मोहाचे फुल पौष्टिक आहे. म्हणून ते गरोदर बाईला, आजारी मानसाला ते खायला देतात. मोहाने पोर भरते मोह पथ्यावर चालते. कारण मोह गरम आहे. उदरनिर्वाहाचे साधन मोहाने खोकला होत नाही. मोहफुलाचे फळ एप्रिल ते जुलै या कालावधीत फळे परिपक्व गळून पडतात. या फळाला ग्रामीण भागात दोडा म्हणुन संबोधले जातात. हि फळे परिपक्व झाल्यानंतर माणसे,जनावरे, शेळ्या,मेंढ्या, माकडे, पोपट खातात या फळातील बिया गोळा करण्यासाठी लोक भल्या सकाळी जातात. या बिया गोळा करने हा एक उदरनिर्वाहाचा साधन आहे. हे मद्यार्क काही औशधा मध्ये वापरतात.
शासनाने मोहफूल खरेदी करावा
सध्या मोहफूल चा इंधन म्हणून वापर करण्यावर संशोधन चालु आहे, अधिकृत कर व्यवसायावर सरकारला दारुच्या विक्रीतून सर्वाधिक महसुल मिळतो. त्यामुळे सरकारने वॉईन शॉप सुरु करण्यास परवानगी दिली होती. मोहाच्या फुलापासुन दारु काढली जाते. आदिवासींना या व्यवसायातून चार पैसे मिळतात. परंतु हा व्यवसाय अधिकृत नाही.सरकारने एकतर उद्योगाला परवानगी द्यावी किवा जी मोहाची फुले आहेत त्याची खरेदी करावी आणी त्यातुन दारु तयार करावी. त्यामुळे आदिवासींनाही रोजगार मिळेल व सरकारलाही टॅक्स मिळेल.
