
चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला असून जनसामान्यांच्या जगण्यावर याचा परिणाम दिसून येत आहे . अश्याच शांतता भंग करणाऱ्या घटनावर अंकुश लावण्यासाठी पोलिस सक्रिय प्रयत्न करीत आहे .वरोरा येथील जी मार्ट राजगुरुनगर येथे अवैधरित्या तलवार व एअर पिस्तल असल्याच्या गुप्त माहितीवरून वरोरा पोलिसांनी एका घरी तपासणी केल्यावर तलवार व एअर पिस्तल जप्त करण्यात आली.जकिर खान ,राजगुरुनगर बोर्डा यांच्या घरी झडती दरम्यान तळ मजल्यावरील बेडरूम मध्ये लाकडी बेड च्या खाली 32 इंची तलवार किंमत 5000 रुपये व Broot कंपनीची एअर पिस्टल किंमत 2000 रुपये ॲपल कंपनीचा मोबाईल फोन किंमत 50000 रुपये ,विवो कंपनीचा मोबाईल फोन 40000 व सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन किंमत 1 लाख रुपये अश्या 1 लाख 97 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळाला असून भारतीय हत्यार कायदा 4,25 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
वरील कारवाई मुमक्का सुदर्शन ,पोलिस अधिक्षक ,रीना जनबंधू ,अप्पर पोलीस अधीक्षक ,नायोमी साटम ,सहायक पोलिस अधिक्षक ,महेश कोंडवार ,पो . नी .स्था .गुन्हे शाखा चंद्रपूर, पोलिस निरीक्षक अजिंक्य तांबडे वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.
