आष्टोणा ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनी उपसरपंच शंकर वरघट यांच्या हस्ते ध्वजारोहण

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

ग्रामपंचायत आष्टोणा येथे 26 जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उपसरपंच शंकर वरघट यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय आष्टोना येथील ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी सरपंच्या सौ अर्चनाताई गोवारदीपे, सचिव वि. सोनुले, सदस्य रविंद्र कन्नाके, नारायणराव येरगुडे, सदस्या सौ. चंदाताई तांदुळकर, सौ. शालीनीताई गोखरे, सौ. मंगलाताई ठाकरे, शाळा समिती अध्यक्ष अनिलभाऊ मेश्राम, ग्राम विविध सहकारी संस्था अध्यक्ष बबनराव ठाकरे, मुख्याध्यापक श्री ढोले सर, जि.प.उच्च प्रा. शाळा शिक्षक व्रुंद विद्यार्थी, विद्यार्थीनी, शाळा समिती सर्व सदस्य, ग्राम विविध सहकारी संस्था सर्व सदस्य, संगणक परिचालक सागर काकडे, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश मेश्राम, शंकर भोयर, गावातील सन्माननीय नागरिक श्री पंढरीनाथजी काकडे, डॉ सुरेशराव महाजन, पंढरीनाथजी बोथले, महादेवराव गोवारदिपे, रुपेश पेचे, रामुभाऊ गाढवे, प्रशांत पावडे, सुरेश गोवारदिपे, सुधाकर गोखरे आणि गावातील नागरिक उपस्थित होते.