
सहसंपादक :रामभाऊ भोयर
गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव व सामाजिक वनीकरण विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांची सहल टिपेश्वर अभयारण्य येथे नेण्यात आली, टिपेश्वर अभयारण्यातील प्राणी व त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.जंगल व प्राणी यांचे महत्त्व व त्यांच्या पर्यावरण रक्षणासाठी काय उपयोग आहे हे सर्व सांगण्यात आले.त्यानंतर अभयारण्य फिरुन झाल्यावर नंतर सर्व विद्यार्थी एकत्रित निरीक्षण कुटीत एकत्र झाले व त्याठिकाणी एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या कार्यक्रमासाठी दिल्ली वरुन आलेले पाहुणे ब्रिगेडियर पवन जडेजा,रेंज फारेस्ट अधिकारी मेघा गुंडकवार,वनपाल धीरज जी चव्हाण, प्राचार्य राजेश शर्मा, लिपिक आशिष काळे आदी उपस्थित होते.ब्रिगेडियर पवन सर यांनी अन्न साखळी मध्ये वाघाचे महत्त्व विशद केले, टिपेश्वर अभयारण्यातील 22 वाघ आणि त्यांच्या इतिहास कथन केला,वाघाची नावे व सद्यस्थिती मध्ये भारतात 3000 वाघ आहे अशी माहिती दिली, कार्यक्रमासाठी रेंज फारेस्ट अधिकारी मेघा मैडम व वनपाल धीरज जी चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
