ट्रक व दुचाकीचा समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

सहसंपादक : रामभाऊ भोयर

वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायवे क्र ४४ वर ट्रक व दुचाकीची समोरासमोर जबर होऊन.या अपघातात दुचाकी वरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळाहून पळून गेला.हा अपघात आज गुरुवार (दि. २८) नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० च्या दरम्यान किन्ही गावासमोर घडला.

देविदास लक्ष्मण भुरकुडे (वय ५५) व देविदास मडावी वय ५० दोघेही रा.उखरडा वाघनख जी चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्याची नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे पीएसआय प्रशांत जाधव यांनी लगेच घटनास्थळाला भेट दिली व घटनेचा पंचनामा करून मृतकाला शवविच्छेदनाकरिता करंजी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून हा अपघात इतका भीषण होता की महामार्गावर रक्ताचा सडा पडला होता दरम्यान महामार्गावर वाहतूक विस्कळीत होऊन ट्रकच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.