
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आज दिनांक ७/२/२०२४ रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान,माझी शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत राबविण्यात आले,त्यात तज्ञ मार्गदर्शक प्रविण मेंढे यांनी हा आजार कसा होतो,त्यांची लक्षणे व लवकर उपचार केल्यावर बरा होतो आदि विषय विस्ताराने समजावून सांगितले,या कार्यशाळेत वर्ग ८व ९ चे विद्यार्थी सहभागी झाले होते. डॉ विवेक भुडे व मुख्याध्यापक राजेश शर्मा व धम्मानंद तागडे सर हजर होते.विद्यार्थ्यांना या उपक्रमात रोगा विषयी सविस्तर माहिती देण्यात आली त्यानंतर कुष्ठरोगावर आधारित निबंध व प्रश्न सोडवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
