ग्रामीण भागातील नागरिक सर्दी ताप खोकला टायफाईड रोगाने बेजार


प्रतिनिधी: शेख रमजान बिटरगांव ( बु )


वातावरणातील बदलाचा परीणाम माणसाच्या शरीरावर होत असतो सध्या पावसाळ्याचे दिवस पण त्यात कधी उन्ह सावली खेळ चालू शहरातील वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात आली आहे. ग्रामीण भागात सर्दी, खोकला, तापाची साथ असून, अपचनाचे विकार आणि हात-पाय दुखण्यामुळे घरो घरचे नागरिक त्रासले आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयांतील ओपीडी दररोज 100 ते 150 रुग्ण तपासणी होत आहे याबरोबर खाजगी दवाखाने रुग्णाणे भरून असल्याचे दिसत आहे सकाळी आणि सायंकाळी गारवा जाणवत असून, दुपारी कडक उन पडत आहे. हे वातावरण सर्दी, खोकला, ताप आणि अपचन यांसारख्या आजारांसाठी पोषक ठरत आहे. घरातील एका व्यक्तीला संसर्ग झाल्यास त्याची लागण अन्य मंडळींनी होत आहे. काही रुग्णांना ताप कमी झाल्यानंतरही खोकला आणि घसादुखीचा त्रास जाणवत वातावरणाचा त्रास लहान मुलांनाही होत आहे. सर्दी, ताप, खोकला, जुलाब आणि उलट्यांनी मुले हैराण झाली आहेत. त्यामुळे मुलांना थंडीच्या ठिकाणी नेणे टाळावे, आजारी व्यक्तींचा सहवास टाळावा,
आजारी असल्यास मुलांना शाळेत पाठवू नये, असे आवाहनही डॉक्टरांनी केले. अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अॅलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिंका येतात. सध्या वातारणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढली आहे
महिनाभरात बदलेल्या वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. त्यामुळे सर्दी, ताप , खोकला या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक त्रास सर्व वयोगटातील नागरिकांना होत असल्याचे दिसून आले आहे. बदलांमुळे अंगदुखी, डोके दुखणे, सर्दी, खोकला, सतत शिंका येणे, घसादुखी आदी त्रास होत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये अलर्जी होण्याची शक्यता असते, त्यामुळे शिंका येतात. सध्या वातारणातील बदलामुळे रुग्णसंख्या वाढली आहे.
पाणी उकळून थंड करून प्यावे- तेलकट व थंड पदार्थांचे सेवन टाळावे- थंड वातावरणात बाहेर पडताना कान झाकावेत- सकाळच्या उन्हात बसावे- योग्य व्यायाम करावा- संतुलित आहार घ्यावा असे प्राथमिक आरोग्य केंद्र सोंदाबी डॉ चंदा पंढरीनाथ पेंदलवाड यांनी सांगितले