
फुलसावंगी प्रतिनिधी /संजय जाधव
फुलसावंगी विद्युत वितरण कंपनीला सर्व सामान्यांना विज खंडीत होण्यामुळे होणाऱ्या त्रासाच काही एक घेणं देणं दिसुन येत नाही.काही दिवसांवर पावसाळा येवून ठेपला असतांना पावसाळ्यापुर्वी करावयाचे काम अद्याप ही ठप्प आहेत.त्याबद्दल कुठल्याही प्रकारचे नियोजन विद्युत वितरण कंपनीने केल्याचे दिसत नाही.
याच नियोजन शुन्येतेचा फटका काल झालेल्या पाऊस व हवेमुळे फुलसावंगी वासियांना बसला.त्याचे झाले असे की काल झालेल्या पावसाने व हवेने मोठ्या प्रमाणात तारा तुटने,तारेवर झाडांच्या फांद्या तुटुन पडने यामुळे वीज रात्रभर गायब होती.अशाही परिस्थितीत काही फिडर वरिल विद्युत कर्मचाऱ्यांनी रात्रीच स्वतः हजर राहुन राहुर,निंगणुर फिडर मध्ये झालेल्या बिघाड दुरुस्ती केल्या व तिकडिल विद्युत पुरवठा पुर्वरत सुरू केला. पण फुलसावंगी येथील जो कर्तव्यावर असलेला हेड लाईनमन प्रशांत बोरुळकर रात्री उशिरा फुलसावंगीच्या विद्युत केंद्रावर हजर असतांनाही गावातील दुरुस्त्या करण्यासाठी असमर्थ असल्याचे सांगून महागाव ला (घरी) निघुन गेला आणि सकाळी ज्यु. अभियंता आकाश गायमुखे यांना भ्रमणध्वनी वर मी आज रजेवर आहे असे सांगून रजेवर गेला त्यामुळे आज सकाळीही फुलसावंगी गावचा विद्युत पुरवठा सुरळीत झाला नसल्याने गावातील नागरिक विद्युत केंद्रावर गेले व ज्यु. अभियंता आकाश गायमुखे यांना विद्युत दुरुस्ती विषयी विचारणा केली असता गायमुखे हे नागरिकांशी सौजन्याने वागणे तर सोडाच उलट कायद्याची भिती दाखवत तुम्ही कोण आहात? तुम्ही काय करता? तुमची पुर्ण नावे कागदावर लिहून द्या मी बघुन घेतो अशी अशी उद्धट भाषा वापरुन अपमानीत केले.
_————–___
▪️ अभियंता व हेडलाईनम यांना मुख्यालयाचे वावडे
फुलसावंगी विद्युत उपकेंद्रा वरुन निंगनुर, कोरटा, राहुर, फुलसावंगी, काळी (टेंभी) हे गावठाण फिडर तर निंगनुर व कोरटा शेतीचे फिडर अश्या एकुण सात फिडर वरुन जवळपास ४२ गावांना विद्युत वितरण कंपनी कडुन विद्युत पुरवठा केला जातो. एवढ्या व्यस्त व महत्वाच्या उपकेंद्रावर कर्तव्यावर असलेले ज्यु.अभियंता आकाश गायमुखे व हेड लाईनमन प्रशांत बोरुळकर हे मुख्यालयी हजर नरहाता महागाव या तालुक्याच्या ठिकाणी रहात असल्याने लहान सहान विद्युत समस्या सोडवायची असली तरी दिवस दिवस संपुर्ण गावचा विद्युत पुरवठा बंद ठेवावा लागतो.
