
वाशिम – येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जैव वैद्यकिय कचर्याच्या योग्य प्रकारे विल्हेवाटीकडे रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून जिल्हा स्त्री रुग्णालयात परिसरात साफसफाई अभावी परिसरात दुगर्र्ंधी पसरली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होवून संबंधीत बेजबाबदार अधिकार्यांवर कारवाईच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक मार्फत उपसंचालक आरोग्य सेवा अकोला यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, उपसंचालक आरोग्य सेवा अकोला यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये व आवारात जैव वैद्यकिय कचरा (बायो मेडीकल वेस्ट) अस्ताव्यस्त पसरुन साचलेला आहे. यामुळे रुग्णालय परिसरातील वातावरण दुषित झाले आहे. त्यामुळे आरोग्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला आळा घालण्याची गरज आहे. मात्र स्थानिक प्रशासन विल्हेवाट लावण्यात निद्रिस्त आहे. याची विल्हेवाट लावणेबाबत आवश्यक निर्देश देण्यात यावेत. तसेच टाळाटाळ करणार्या व बेजबाबदारपणे वागणार्या अधिकार्यांची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. प्रत्यक्ष पाहणी करावयाची झाल्यास स्थानिक रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांची जैव वैद्यकिय कचर्याची विल्हेवाट लावणेबाबत पाहणी करावी. व आढावा घेवून दुर्लक्ष करणार्यांचे बाबतीत जागीच निर्णय घेवून शासकीय कारवाई करण्यात यावी. उचित कार्यवाही न झाल्यास व दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा मनसेने दिला आहे.
