अन्यायाविरुद्ध एल्गार फुकारणारे योद्धा म्हणजे क्रांतिकारी शामादादा कोलाम -शंकर वरघट {जयंतीदिनी प्रतिमेचे अनावरण, वैचारिक उद्बोधनाचे पर्व }

राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर

शामादादा कोलाम यांचे विचार समाजासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.अन्यायाविरुद्ध धगधगता एल्गार म्हणजे क्रांतिकारी शामादादा कोलाम. सर्वांनी त्यांचे अनुकरण केले तर तीच त्यांच्या स्मृतीस खरी श्रद्धांजली ठरेल. असे प्रतिपादन मनसे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी केले. समाजामध्ये वैचारिक प्रबोधन ज्यांनी घडवून आणले त्यातील एक बिनीचे शिलेदार म्हणून शामादादा यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्व व्यापक प्रमाणात समोर आले पाहिजे असे विचार त्यांनी मांडले. खेमकुंड येथे या वेळी शामादादा कोलाम यांचे प्रतिमेचे अनावरण करण्यात आले.
२६ नोव्हेंबर आदिम जमाती मधिल क्रांतिकारी युगपुरुष शामादादा कोलाम यांची जयंती कार्यक्रम राळेगाव तालुक्यातील खेमकुंड या गावात साजरी करण्यात आली होती.
आदिम कोलाम समाजातील लोकांना वैचारिक उद्बोधन करून शिक्षण आणि समाजकारण या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे मनोगत जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी व्यक्त केले यावेळी शामादादा कोलाम यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. यावेळी मनसे राळेगाव तालुकाध्यक्ष राहुल गोबाडे, मनविसे तालुका अध्यक्ष शैलेश आडे, मनसे तालुका उपाध्यक्ष सुरज लेनगुरे, तालुका सरचिटणीस वूषभ गुरनुले, संघटक नरेंद्र खापणे, कोषाध्यक्ष उमेश पेंदोर, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष संदिप कुटे, सचिन बोंडे, अमर आत्राम, मंगेश मोहुर्ले, गौरव चवरडोल, रवि मुंडाली, अनील वाढई विशाल राऊत, रामु देवनारे, अशवीन कुंभेकर, अंकुश जुनगरे, अमीत सुरपाम, गजानन बावणे, गोवीदा गाडेकर, गजानन ऊईके,गणेश नागोसे गजानन भारसकरे कुंदन मेंश्राम उमेश मेश्राम अभिषेक बेलेकर अमर नागोंसे, रुपेश टेकाम, राहुल आञाम सुमीत देवनारे प्रतीक रोहपाटे निलेश गाडेकर सुनिल देवनारे निलेश गारगाटे सागर आञाम आणि गावातील नागरिक उपस्थित होते

विदर्भाचे रॉबिनहूड म्हणून शामादादा कोलाम यांची ओळख आहे. कळंब तालुक्यातील निरंजन माहूर येथे त्यांचा जन्म झाला. आपल्या यवतमाळ जिल्ह्यात या महान व्यक्तिमत्वाचा जन्म व्हावा ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब म्हणावी लागेल. सावकार व जमीनदाराकडून होणारा आदिवासींचा छळ त्यांनी थांबविला. इंग्रजांविरोधात त्यांनी बंड पुकारले. अन्याया विरुद्ध लढा देऊन त्यांनी सर्वांना एकत्रित केले. अनेकांच्या जमिनी मिळवून दिल्या. शामादादा हे अत्यंत गरिबीतून वर आलेले लढवये नेते होते. त्या मुळे गरिबीची त्यांना जाणीव होती. अशा या महान व्यक्तिमत्वाच्या विचाराला मी नमन करतो. त्यांच्या नेतृत्वाच्या विचाराला पुढे घेऊन जाण्याची गरज आहे. आज या महान व्यक्तीची जयंती आपण मोठ्या उत्साहात साजरी करतो आहोत. त्यांच्या पावन स्मृतीला मी अभिवादन करतो
शंकर वरघट
जिल्हा उपाध्यक्ष यवतमाळ
महाराष्ट्र नवनिर्माण सेना