
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव उपविभागात भटके व विमुक्त समाजाच्या सक्षमीकरणासाठी आयोजित भटके व विमुक्त दिवस मोठ्या उत्साहात तसेच सामाजिक ऐक्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. सुधीर पाटील, उपविभागीय अधिकारी राळेगाव यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. अमित भोईटे, तहसीलदार राळेगाव, श्रीमती इसाळ, सहाय्यक गटविकास अधिकारी, मार्गदर्शक अभिजित घोडे, निरीक्षक (इतर मागास व बहुजन कल्याण विभाग, यवतमाळ) तसेच श्रीमती छाया पिंपरे यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अरुण भगत (ना.तह.) यांनी केले तर सूत्रसंचालन मंडळ अधिकारी श्री. महादेव सानप यांनी केले.
समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणारे डॉ. राहुल सोनाळे, अरुण राजू घुले, बंटी राजू घुले, विशाल बाळाभाऊ शिंदे आणि हनुमान जगदेव माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री. सखाराम कचरे, श्री. नामदेव घुले, डॉ. भीमराव कोकरे, श्री. सागर एंबडवार आणि श्री. राहुल चव्हाण यांनी समाजाच्या समस्या, विकासाची दिशा व शासनाच्या भूमिका यावर मार्गदर्शन केले.
भटके विमुक्त विकास परिषद, अहिल्याबाई होळकर धनगर समाज संघटना, मी वडार महाराष्ट्राचा, भटके विमुक्त कल्याणकारी परिषद, सरोदी समाज संघटना, राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल आदी मान्यवर संघटनांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. विक्रांत खरतडे (नायब नाझर, तहसील कार्यालय राळेगाव) यांनी सर्वांचे आभार मानले.
या कार्यक्रमातून मिळालेल्या ऊर्जेच्या बळावर समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार उपस्थित मान्यवर व समाजबांधवांनी व्यक्त केला.