
सहसंपादक : रामभाऊ भोयर
अलीकडे शाळांमध्ये मुलामुलींवर होणारे लैंगिक अत्याचार वाढले आहेत. अशा गुन्ह्यांबाबत सरकारने या आधीच कडक कायदे केले आहेत. हे कायदे मुले आणि पालकांना पुन्हा पुन्हा समजावून सांगणे व त्यांना सावध राहणे आता गरज आहे
त्यामुळे या अनुषंघाने सैनिक पब्लिक स्कूल वडकी येशील प्राचार्य श्री सचिन ठमके सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याना स्वरक्षणाचे धडे देण्यात आले. अलीकडे देशातच नव्हे तर राज्यात सुध्दा शाळेतील विद्यार्थी लैंगिक अत्याचारांचे बळी पडत आहे
या बद्दल सखोल मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री सचिन ठमके सर म्हणाले, की
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात अल्पवयीन मुलामुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार शक्ती कायदा आणत असताना दुसरीकडे महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहेत.
त्यामुळे या पासून विद्यार्थ्याना सावध राहणे व पालक वर्गाना सतर्क राहणे गरजेचे आहे .
या विषावयवर प्रा रंजना तिरणकर, प्रा हेमांगी वडतकर, प्रा गित खुराणा , प्रा आरती कुंडलवार, प्रा स्मिता तलवटकर, प्रा स्मिता ठमके, प्रा उषा साखरकर यांनी मुलींना तर प्राचार्य श्री सचिन ठमके सर, प्रा मिनेश गौरकर, प्रा भरत, प्रा शेखर नंदुरकर, प्रा प्रफुल चौथे प्रा कैलास शेंडे , कला शिक्षक मैफुज अली, संगीत शिक्षक विजय चांदेकर व इतर शिक्षकांनी मुलांना या बद्दल सखोल मार्गदर्शन केले या वेळी वर्ग १ली ते वर्ग १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
